Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणानिरीक्षण. उदायीची हकीगत. जैनांनी उदायीविषयीं बरीच हकीकत हेमचंद्राच्या परिशिष्टपर्वात देऊन ठेविलेली आहे. भारतीय इतिहासांत याचें राज्य महत्त्वाचें आहे. कारण, याच्या राज्यांतच कुसुमपुर शहर बांधिलें गेलें. वायुपुराणानेंही यानें कुसुमपूर शहर बांधल्याचा उल्लेख केलेला आहे. गर्गानेही तसाच उल्लेख केलेला आहे. हेमचंद्राच्या परिशिष्टपर्वोत सहाव्या सगत उदायीची हकीकत आहे. तिचा सारांश हाः -- १९४ श्रेणिक ऊर्फ बिंबिसार राजानें राजगृहांत राज्य केल्यानंतर त्याचा पुत्र कणिक ऊर्फ अजातशत्रु यानें आपली राजधानी चंपानगरीस नेली. अजात- शत्रूनंतर त्याचा पुत्र उदायी हा गादीवर बसला. त्यास चंपानगर राजधानी असणें न आवडल्यामुळे त्यानें आपली नवी राजधानी कोठें वसवावी याचा शोध करण्यासाठी माणसें पाठविलीं. शेवटी गंगेच्या कांठी एक पाटलवृक्ष प्रफुल्लित असलेला पाहून तेथें राजधानी वसविली. त्या शहरास कुसुमपूर किंवा पाटलिपुत्र म्हणत. उदायी जैनधर्मानुयायी होता. उदायी क्षत्रिय होता तरी धर्माकरितां भेदाच्या धोरणानें अनेक राजे त्यानें पादाक्रांत केले. स धर्मबाधया क्षात्रमपि तेजः प्रभावयन् । आत्मनः सेवकांश्चक्रे तुर्योपायेन भूपतीन् । परिशिष्टपर्व, सर्ग ६, श्लो. १८७, उदायी राजा असेपर्यंत आपणांस कांहीं सुख नाहीं असें त्या वेळच्या राजांस वाटत असे. राजानोऽत्यंतमाक्रांतास्ते तु सर्वेऽप्यचिंतयन् । यावज्जीवत्युदाय्येष तावद्राज्यसुखं न नः ॥ १८८ ॥