वि. पू. ४१० २५५ प्रकरण तिसरें. ५२७ ४६७ ३१२ १९३ महावीराचें निर्वाण. उदायीचा खून चंद्रगुप्ताचा राज्याभिषेक अजातशत्रूला जैनलोक कूणिक म्हणत. त्याचा बाप बिंबिसार यास श्रेणिक म्हणत. उदायी हा अजातशत्रूचा पुत्र होता. त्याचा खून इ. पू. ४६७ साली झाला, ही एक महत्त्वाची परंपरा कळते; व ती ऐतिहासिक आहे. जैनपरंपरांवरून दुसरी एक गोष्ट सिद्धं होते कीं प्रद्योत व पालक हे गौतमबुद्ध व महावीर यांचे काळीं व थोडेसे नंतर उज्जनीस राज्य करीत असत. मगध देशांत राज्य करीत नव्हते. आपली पुराणें बारीक दृष्टीनें तपासून पाहतांही हीच गोष्ट कळून येते. ह्या पूर्वीचे राजे वीतिहोत्र कुळांतले होते. तेव्हां वीतिहोत्र कुळीचे राजे अवंतींत राज्य करीत असतां, प्रद्योतानें आपल्या स्वामीचा खून करून राज्य बळकावलें. बृहद्रथेष्वतीतेषु वीतिहोत्रेष्ववांतषु । प्रद्योतः स्वामिनं हत्वा स्वपुत्रमभिषेक्ष्यति ॥ यावरूही मगध देशचे बृहद्रथराजे संपल्यावर अवंतीस वीतिहोल कुळीचें राजे असतां प्रद्योतानें स्वामीस मारून टाकून आपल्या मुलास अभिषिक्त केलें. तेव्हां प्रद्योतकुळीचे राजे मगधदेशचे नसून तत्कालीन अवंतीचे होते असेंच दिसतें. असो. उदायीच्या मरणाचा काळ जैनपरंपरेवरून नक्की कळल्यामुळे हा राजा कोण व त्याविषयी काय माहिती मिळते हैं पाहणें जरूर आहे. १३
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२०८
Appearance