पुरवणी. ( २ ) मागें भागवताच्या उल्लेखांविषयीं बरेंच लिहिलेले आहे. ( पृ. ७६-८२ ). त्यानंतर, वैशंपायनाच्या नीतिशास्त्रावरील एका ग्रंथांत भागवताचा एक नवीन उल्लेख मिळाला. वैशंपायनानें पारिरक्षित जनमेजयास हा ग्रंथ तक्षशिला नगरींत सांगितलेला आहे. प्रो. गस्टॅव्ह ऑपर्ट यांनी या वैशंपायनाच्या नीतिग्रंथाची इ० स० १८८२ मध्ये एक प्रत काढिली आहे. या ग्रंथाचें नांव नीतिप्रकाशिका होय ! त्यांत लिहिलेले आहे की:-- धर्मशास्त्रपुराणानि ह्यपराण्हे समभ्यसेत् । संध्यां चोपास्य विधिवदग्निं हुत्वा समाहितः ॥ ९० ॥ भुत्क्वा, भागवतं शास्त्रं पठित्वा ध्यानसंयुतः । संविशेच्च यथाकालमुत्तिष्ठद्विगतक्लमः ॥ ९१ || एवं वृत्तस्य नृपतेर्नीतिमार्गानुसारिणः । धर्मार्थकाममोक्षाश्च सिध्येयुर्नात्र संशयः ९२ ॥ १६९ हा ग्रंथ वैशंपायनाचाच खुद्द असल्यामुळे त्या वेळी भागवत प्रसिद्ध असल्याबद्दलचा हा निर्विवाद पुरावा मिळाला. गर्गाचार्याच्या गर्गसंहितेंत असाच भागवताचा उल्लेख आहे हैं मागें लिहिलेलेच आहे. ( पृ. ८२ ) ( ३ ) स्कंदपुराणाच्या कुमारिकाखंडांत, महाकालमाहात्म्यांत, करंधम- महाकालसंवादामध्ये खालील श्लोक आढळतात. हे श्लोक भारतेतिहाससंशो- धकमंडळाचे चिटणीस रा. खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी मला दाखविले; त्रिपु वर्षसहस्रेषु कलेर्यातेषु पार्थिव । त्रिं- ( त्रि ) शते च दशन्यूने ह्यस्यां भुवि भविष्यति ॥१॥ शूद्रको नाम वीराणामधिपः सिद्धसत्तमः । ( नृपान्सर्वान्पापरूपान् वर्धितान्यो हनिष्यति ॥ २ ॥ )
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१८४
Appearance