Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. एवमादित्यसंज्ञा च तत्रैव परिगद्यते । अष्टादशभ्यस्तु पृथक् पुराणं यत्प्रदिश्यते || ६३ || विजानीध्वं द्विजश्रेष्ठास्तदेतेभ्यो विनिर्गतम् || मत्स्यपुराणाच्या वेळी उपपुराणांपैकी फक्त नारसिंहपुराण (पद्मांतर्गत ); नंदीपुराण ( स्कंदांतर्गत ? ); सांबपुराण ( भविष्यांतर्गत ) व आदि- त्यपुराण ( तेंच ) एवढीच उपपुराणे म्हणून माहीत होतीं; व तीही मुख्य पुराणांचे निवडक भाग म्हणून माहीत होती. ( इ० स० ४०० ) पुढें सूतसंहितेच्या वेळी उपपुराणें इतकी झाली होतीं:- १ सनत्कुमारपुराण, २ नृसिंहपुराण, ३ नंदीपुराण, ४ शिवध- र्मपुराण, ५ दुर्वासपुराण, ६ नारदोपपुराण, ७ कपिलपुराण, ८मानव- पुराण, ९ उशनसपुराण, १० ब्रह्मांडोपपुराण, ११ वारुणपुराण, १२ कालीपुराण, १३, वासिष्ठलिंगपुराण, १४ माहेश्वरपुराण, १५ सांब- पुराण, १६ सौरपुराण, १७ पाराशरपुराण, १८ मारीचपुराण, १९ भार्गवपुराण. ही सर्व वेगळाल्या मुनींनी लिहिली, अशी तेव्हां समजूत होती. देवी- भागवतांत उपपुराणांची नांवें आलेली आहेत; त्यांत शिवपुराण आलें तेंच शिवधर्म असावें; भार्गवपुराणाच्या ऐवजी ' भागवत 9 पुराण आहे; बाकीची १६ नांवें सारखीच आहेत. एकंदर १८ उपपुराणें दिलेली आहेत. एक ब्रह्मांडोपपुराण देवीभागवतांत नाहीं. देवीपुराणानेही सूत- संहितेप्रमाणेंच हीं पुराणें अनेक महात्म्यांनी केली, असे म्हटले आहे:- •एतान्युपपुराणानि कथितानि महात्मभिः || - या १८।१९ उपपुराणांशिवाय लोकांत अनेक उपपुराणें म्हणून प्रसिद्ध आहेत; ती १४वे शतकानंतरचीच असली पाहिजेत हैं उघड आहे.