Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निरीक्षण यथा युगं चतुष्पादं विधात्रा विहितं स्वयम् । चतुष्पादं पुराणं तु ब्रह्मणा विहितं पुरा ||

प्रक्रिया प्रथमः पादः कथावस्तुपरिग्रहः । उपोद्धातोऽनुषंगश्च उपसंहार एव च ॥ धर्म्य यशस्यमायुष्यं सर्वपापप्रणाशनम् || पुढें लोकसंख्याही दिलेली आहे; ती अशी:- १६२ १ प्रक्रियाषाद ४८०० २ अनुषंगपाद ३६०० ३ उपोद्धातपाद २४०० ४ उपसंहारपाद १२०० १२००० राजेंद्रलालच्या आदर्शपोर्थीत- ( वायुपुराणाच्या ) ही शेवटीं " इति महापुराणे वायुप्रोक्ते द्वाद- शसाहस्यां संहितायां ब्रह्माख्यं समाप्तम् ॥ " येथें 'ब्रह्माख्यं म्ह. ' ब्रह्मांडाख्यं ' असाच अर्थबोध होतोसें दिसतें. बहुतेक पुराणमतें ब्रह्मां- डाची श्लोकसंख्या १२००० च आहे. तेव्हां हीं ( वरील दोन ) पुस्तकें वायुपुराणाच नसून ब्रह्मांडाची होत, हे कळून येईल. वंगवासी प्रेसनें छापलेल्या शिवपुराणांच्या वायुसंहितेंत' वायुपुराणोक्त ' श्वेतकल्पाचा प्रसंग आहे; शिवाय, श्रीधरस्वामींनीं भागवतटीकेंत नैमिष शब्दावर टीका करितेवेळी खालील श्लोक उतरून घेतलेला आहे:- तथा च वायवीये । “ एतन्मनोरमं चक्रं मया सृष्टं विसृज्यते यत्रास्य शीर्यते नेमिः स देशस्तपसः शुभः ।। " सोसाइटीनें छापलेल्या वायुपुराणांत हा श्लोक आढळत नसून याढाई तो असा आढळतो:-