प्रकरण दुसरें. मत्वा श्रुत्वा पुराणानि लोकेभ्यः प्रचकाशिरे || मुनयो धर्मशीलास्ते दीनानुग्रहकारिणः । यथा वेदं पुराणं तु वसिष्ठाय पुरोदितम् || तु तेन शक्तिसुतायोक्तं जातूकर्ण्याय तेन च । व्यासलब्धं ततश्चैतत् प्रभंजनमुखोद्गतम् ॥ प्रमाणीकृत( त्य ) लोकेऽस्मिन् प्रावर्तयदभ्दुतम् || १६१ या नारदपुराणाच्या अनुक्रमणिकेप्रमाणे पहातां हें चतुष्पाद पुराण म्हणजे हल्लीं ज्यास वायुपुराण म्हणतात तेंच होय असे दिसून येईल. हें चतुष्पादलक्षण संपूर्णपणे प्रचलित वायुपुराणास बरोबर लागू पडतें. या पुराणाच्या १६।१७।१८ अध्यायांत भविष्यकल्पवृत्त बऱ्याच विस्तृत तऱ्हेनें सांगितलेलें आहे; इतकें सविस्तर तें कोठेच सांगितलेलें नाहीं. या पुराणाच्या अ. ३३-५८ पर्यंत ब्रह्मांडाचा जसा व जितका विस्तृत भूगोल दिलेला आहे तसा दुसऱ्या कोठेंही नाही. यामुळे वायुपुराण म्हणून प्रचलित असलेलें चतुष्पाद पुराणच (उ. आनंदाश्रमप्रत, एशियाटिक सोसाइटी प्रत ) · ब्रह्मांडपुराण होय, असें पं. ज्वालाप्रसाद यांचें मत आहे. या ब्रह्मांड पुराणाच्या पोथ्यांमधून कित्येक ठाई "वायुप्रोक्तसंहितायां " असे लिहिलें असतें; पण वरील नारदीय पुराणांतील उताऱ्यांत हें ब्रह्मांडपुराण " प्रभंजनमुखोद्गतम् " आहे हैं स्पष्ट म्हटलेलेच आहे. एशियाटिक सोसाइटींत व आनंदाश्रमांत छापलेलें वायुपुराण नसून ब्रह्मांडच आहे. ही दोन्ही चतुष्पादच आहेत. एशियाटिक सोसाइटीच्या प्रतीत म्हटले आहे की: - ( ८१ - २ ) एवं द्वादशसाहस्रं पुराणं कवयो विदुः । यथा वेदश्चतुष्पादः चतुष्पादं तथा युगम् || ११
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१७६
Appearance