पुराणनिरीक्षण, अपमृत्युक्रियोक्तिश्च विपाकः कर्मणां नृणाम् । कृत्याकृत्यविचारश्च विष्णुध्यानं विमुक्तये ॥ स्वर्गतो विहिताख्यानं स्वर्गसौख्य निरूपणम् । भूर्लोकवर्णनं चैव सप्तधा लोकवर्णनम् । पंचोर्ध्वलोककथनं ब्रह्मांडस्थितिकीर्तनम् ॥ ब्रह्मांडानेकचरितं ब्रह्मजीवनिरूपणम् । आत्यंतिकलयाख्यानं फलस्तुतिनिरूपणम् ॥ इत्येतद्गारुडं नाम पुराणं भक्तिमुक्तिदम् ॥ नारद व मात्स्यपुराणानुसारच प्रचलित गरुडपुराण आहे; नारद- पुराणाच्या अनुक्रमणिकेप्रमाणेंही सर्व विषय यांत आहेत. याची श्लोकसंख्या मात्स्यांत १८ हजार व नारदांत १९ हजार सांगितलेली आहे; पण हल्लीं हें सुमारें ७ हजारांहूनही प्रायः कमीच आढळतें; प्रचलित गरुडपुराणांतील भविष्यराजवंशाख्यानाचा पूर्वीश पहातां कळून येतें कीं हें पुराण मूळ जनमेजयाच्या वेळी संकलित झालेले होतें, ( अ १४४ - ४२ ) पुढील भविष्यराजवर्णनांत राजा शूद्रकापर्यंतच नांवें आहेत. ( शुद्धोदनो राहुलश्च सेनजिच्छूद्रकस्तथा । १४५ - ८). विष्णु, मत्स्य वगैरे पुराणांत आंध्र- गुप्त वगैरे पुढील राजांचा उल्लेख असल्यामुळे, त्यांच्या अपेक्षेनें प्रचलित गरुडपुराण त्यांहून प्राचीनतर मानतां येईल. हैं अनेक विषयांचें असल्यामुळे ह्यास कोणी कोणी अर्वाचीन पुराण समजतात; परंतु यांतील कोणताही विषय अर्वाचीन दिसत नाहीं. मूळच्या गरुडपुराणाचे संपूर्ण श्लोक मिळत नसले व प्रचलित गरुडांत कांहीं कांहीं ठाई ह्या माहात्म्यासारखी अर्वाचीन प्रकरणें असली तरी, हे भाग सोडून बाकीच्या भागांत सूळचेंच पुराण कायम राहिलेलं आहे असे म्हणण्यास बिलकुल हरकत नाहीं.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१७१
Appearance