Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण, छापलेल्या वराहपुराणांत १०७०० श्लोक आहेत; पण ते अपूर्ण आहे, असें नारदसूचीवरून कळून येतें. नारदसूचीप्रमाणे वरील वराह हा फक्त पूर्वभाग आहे. उत्तरभागांतील पुलस्त्यकुरुराजसंवादांत सविस्तर तीर्थाचें माहात्म्य व अनेक प्रकारची धर्माख्यानें व पुष्करपर्व इत्यादि विषय प्रचलित मुद्रित वराहांत नाहींत ! ! ! au १२८ हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणींत वराहोक्त बुद्धद्वादशीचा उल्लेख आहे ( १३ वें शतक ); गौडाधिप बल्लाळसेनाच्या दानसागरांत या वराहांतून उतारे घेतलेले आहेत, ( १२ वें शतक ); तसेंच अपरादित्यानेंही आपल्या याज्ञवल्क्याच्या स्मृतीवरील टीकेंत या पुराणांतील उतारे घेतलेले आहेत. ( १२ वें शतक ). या पुराणांत वैष्णवधर्माचे फारसें प्राचीन स्वरूप नाहीं, असे विल्सनचें मत आहे; म्हणून हलांच्या वराहाचा काळ ते १२ व्या शतकाच्या पूर्वभाग ( इ० स० सुमारें ११०० ) ठरवितात ! स्कंदपुराण, १३ वें. हल्लीं स्कंदपुराण म्हणून स्वतंत्र ग्रंथ कोठेंही मिळत नाही. अनेक संहिता, खंड, हजारों माहात्म्यें या पुराणांतील म्हणून प्रसिद्ध आहेत. हे संपूर्ण भाग मिळूनच स्कंदपुराण व्हावयाचें; पण या भागांचें पूर्वापर्यही नीट कळत नाहीं ! याकरितां प्रथम या पुराणांत कोणते विभाग होते ( हैं पाहूं:- ) स्कंदपुराणांतील शंकरसंहितेपैकीं हालास्यमाहात्म्यांत लिहिले आहे की:- स्कांदमद्यापि वक्ष्यामि पुराणं श्रुतिसारजम् ॥ ६२॥ षड्डिधं संहिताभेदैः पंचाशत्खंडमंडितम् । आद्या सनत्कुमारोक्ता द्वितीया सूतसंज्ञिता ॥६३ ॥