प्रकरण दुसरें. शिवमाहात्म्यसंयुक्तं स्नानयागादिकं ततः सर्वपूजाविधिश्चैव शिवपूजा च मुक्तिदा ॥ दानानि बहुधोक्तानि श्राद्धप्रकरणं ततः । प्रतिष्ठा तत्र गदिता ततोऽघोरस्य कीर्तनम् || वज्रेश्वरी महाविद्या गायत्रीमहिमा ततः । त्र्यंबकस्य च माहात्म्यं पुराणश्रवणस्य च || एतस्योपरिभागस्ते लैंगस्य कथितो मया । व्यासेन हि निबद्धस्य रुद्रमाहात्म्यसूचिनः ॥ प्रचलित लिंगपुराणांत लिहिले आहे की:- ईशानकल्पवृत्तांतमधिकृत्य महात्मना । ब्रह्मणा कल्पितं पूर्व पुराणं लैंगमुत्तमम् ॥ २-१ ॥ या लिंगपुराणांत मत्स्यनारदोक्त लिंगपुराणांतील सर्व कथा आहेत; तथापि अग्निकल्पाच्या ठाई ईशानकरपाची हकीकत आहे. संप्रदायाच्या द्वेषाच मूळपुराणांत वाक्ये येणे शक्य नाहीं; तीं वाक्यें नंतरचींच असली पाहिजेत. अशा प्रकारचे प्रक्षिप्त श्लोक सोडून दिले म्हणजे हें एक बरेंच प्राचीन पुराण ठरेल; याची लोकसंख्या हल्ली ११ हजारच आहे. श्रीशंकराचार्यांनी विष्णुसहस्रनामभाष्य व सनत्सुजातीयभाष्य यांत लिंग- पुराणांतील उतारे घेतले आहेत. या पुराणाविषयी विल्सनचें मत असें आहे की कस्पभेदाशिवाय मात्स्योक्त लिंग व प्रचलित लिंगपुराण यांत कांहीं फरक नाहीं. पहा:- “ The Ling Purana confirms accurately enough to this (description. The Kalpa is said to be Isána, but this is the only difference. The work is, therefore, tho same as that referred to by the Matsya. ... ...... १२५ "
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१४०
Appearance