Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणानिरीक्षण, यापासून अष्टमीकल्पाचा आरंभ व विष्णुपर्व हीं दिसून येतात; परंतु या पोर्थीत या पूर्वीच्या अध्यायांत जितक्या कथा आहेत त्या त्यांस मिळालेल्या भविष्यपुराणांतील कथांशी मेळ पावत असल्या तरी अधिकशा भागांत त्यांचा त्यांशी मेळ नाहीं. यावरून असा संभव आहे की हा अधिकसा अंश प्रक्षिप्त असावा; म्हणजे पुढील काळांत कोणी तरी तो बनवून त्यांत घातला असावा, असे त्यांनी आपले मत दिलेले आहे. १०८ • कांहीं भविष्याच्या ब्रह्मपवत १३१ अध्याय आहेत; पंडित ज्वा. प्र. यांस मिळालेल्या दुसऱ्या भविष्याच्या विष्णुपर्वाच्या पूर्वीशांत १५० अध्याय आहेत. बहुतेक पुराणांच्या मतें भविष्यपुराणाची लोकसंख्या १४/१४३ • हजार आहे; पण दुसऱ्या भविष्यपुराणाच्या पहिल्या अध्यायांत त्याची श्लोकसंख्या ५० हजार आहे असें म्हटलेलें आहे ! ! ! शिवपुराणाच्या वायुसंहितेंत ज्याप्रमाणे वाढलेल्या व नवीन शरीर पावलेल्या शिवपुराणाची लोकसंख्या एक लक्ष म्हणून सांगितली आहे, त्याप्रमाणें ही अत्युक्ति सम- जली पाहिजे ! द्वितीय भविष्यपुराणांत अष्टमीकल्पापासून विष्णुपर्वाचा आरंभ होत असला तरी, त्या पर्वोत पुढें विशेषेकरून रुद्राचें माहात्म्य असल्यामुळे त्या पर्वात शैवपर्वही मिसळलेले आहे हैं कळून येतें, शेषभागांत सौर- पर्वाचे विषय नाहींत इतकेंच नव्हे तर याचें प्रतिसर्गपर्वही मिळत नाहीं किंवा ज्वा. प्र. यांस मिळाले नाही. वस्तुत: हें पुराण बरेंच प्राचीन आहे; पण हल्लींच्या स्वरूपांत त्याचें मूळ स्वरूप बहुश: लुप्त होऊन त्यांत नव्या मजकुराची जोड झालेली आहे. आपस्तंबधर्मसूत्रांत भविष्यपुराणाचा उल्लेख आलेला मागें दाखविले- लाच आहे. (पृ. २७ ) विषय दुसऱ्या भविष्यपुराणाच्या दुसऱ्या अध्यायांत पं. ज्वालाप्रसाद यांस आढळला. यावरून यांत अनेक भाग प्रक्षिप्त