Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. असून त्यांत भविष्यासह सर्व कथा व्यासांनी सांगितल्या आहेत. हें पुराण १४ हजारांचें आहे. यांत भविष्य व गुणांच्या तारतम्यानें सर्व देवांचें साभ्य सांगितलेलें आहे; कारण, ' समं ब्रह्म ' अशी श्रुति आहे. " वेंकटेश्वरप्रेसमध्यें व त्यावरून वाईस छापलेल्या भविष्यपुराणांत प्राचीन भविष्यपुराणांचीं कांहीं कांहीं लक्षणे मिळतात. यांत ब्राह्मपर्वांत आदित्यमाहात्म्य असलें तरी अघोरकल्पवृत्तांत किंवा ब्रह्मयानें मनु स्वायंभुव यास जगाची स्थिति सांगितलेली आढळत नाही. हल्लींच्या भ. पुराणांत नारदसूची- प्रमाणें पांच पवें मिळत नसून ब्राह्मपर्व व भविष्यासह प्रतिसर्गपर्व मात्र आहेत; पण या प्रतिसर्गपर्वत अगदर्दी आधुनिक अशी सर्व प्रकारची भविष्य आढळतात. प्रतिसर्गपर्वातील पुष्कळ अंश प्रक्षित असावा, असेंच आम्हांस वाटतें. १०७ नारदपुराणाच्या सूचीप्रमाणें भविष्यपुराणाचा विभाग ब्राह्म, वैष्णव, शैव, सौर, व प्रतिसर्ग या पांच पर्वात झालेला आहे. पूर्वी भविष्यपुराणांत पांच पवें होतीं हैं प्रचलित ब्राह्मपर्वावरूनही कळून येतें, जसें :- प्रथमं कथ्यते ब्राह्मं द्वितीयं वैष्णवं स्मृतम् । तृतीयं शैवमाख्यातं चतुर्थ स्वाष्ट्रमुच्यते ॥ पंचमं प्रतिसर्गाख्यं सर्वलोक्रैः सूपूजितम् । एतानि तात ! पर्वाणि लक्षणानि निबोध मे । संर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च ॥ वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम् ॥ ब्रह्मवर्त, अ० १ ला यांत भविष्योत्तराचा उल्लेख नाहीं. नारदमतानें अष्टमीतिथीच्या कल्पापासून वैष्णवपर्वाचा प्रारंभ होतो. पं. ज्वालाप्रसाद यांस मिळालेल्या द्वितीय भविष्यपुराणाच्या १५१ अध्या-