Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें, नारदपुराणाच्या सूचींतील सर्व लक्षणे हल्लींच्या उपलब्ध अग्निपुराणांत असली तरी त्यांत ईशानकल्पाचा वृत्तांत नाहीं एवढाच गौणपणा आहे; कारण प्रचलित अग्निपुराणाच्या दुसऱ्या अध्यायांत म्हटले आहे कीं:- प्राप्ते कल्पेऽथ वाराहे कूर्मरूपोऽभवद्धरिः ॥ ९९ नारदसूचीतील अग्निवसिष्ठसंवाद व ईशानकल्पवृत्तांत हीं दोन सोडून बाकीचे सर्व विषय प्रचलित पुराणाशी जुळतात; यावरून त्या वेळच्यापेक्षां हल्लीं हैं पुराण लहान असावें असें अनुमान होतें. नारदपुराणानें याची संख्या १५ हजार व मात्स्यानें १६ हजार दिली आहे. हल्लींच्यांत जवळ जवळ १२ हजार श्लोक आहेत. यावरूनच हल्लींचें अग्निपुराण पूर्वीच्या अ. पु. चें संशोधित व अवशिष्टरूप असण्याचा संभव आहे. बल्लाळ- सेनानें दानसागरांत अग्निपुराणांतील म्हणून जे उतारे घेतलेले आहेत त्यांतील कांहीं यांत मिळत नाहीत, यावरूनही या पुराणाचा पूर्वभाग कांहीं लुप्त झालेला आहे असे वाटतें. तसेंच, स्कंदपुराणांतील शिवरहस्य- खंडांत लिहिलेले आहे कीं, अग्नीचें महात्म्य सांगणे हाच अग्निपुराणाचा मुख्य हेतु आहे; पण हें लक्षण तर प्रचलित अग्निपुराणाशीं मुळींच लागू पडत नाहीं ! यावरून प्रचलित अग्निपुराण हैं प्रतिसंस्करण पावलेले नूतन अग्नि- पुराण आहे असें दिसतें; तथापि हैं याचें नूतन स्वरूपही नारदसूचीच्या वेळीं होतें; किंवा उलट म्हणावयाचें म्हणजे असें कीं, नारदसूची झाली तेव्हां हैं प्रचलित अग्निपुराण असून त्यांत ईशानकल्पवृत्तांत व वसिष्ठाग्निसंवाद हे ३४ हजार लोकांचे भाग अधिक होते. हे भाग पुढें लुप्त झाले. हे भाग बहुधा पुराणाच्या प्रारंभीच असावेत. मूळचें अग्नीच्या माहात्म्याने भरलेले अग्निपुराण तर अजी लुप्त झाल्याप्रमाणे दिसतें!