मुद्द्यांची चर्चा अद्यापि भारतीय जनांत होऊन त्यांविषयीं निश्चयात्मक सिद्धांत झालेला नसल्यामुळे कित्येक मंडळीच्या योग्य सूचनेवरून या पुराण... निरीक्षण ग्रंथाचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन स्वतंत्र भागच करण्यांत आलेले आहेत. पूर्वार्ध पुरागप्रिय मंडळीस व तसेंच आधुनिक चिकि-- त्सक व ऐतिहासिक मंडळीस सर्व बाजूंनी संमत होण्यासारखा असल्यामुळे तो स्वतंत्रपणे छापून, ज्यावर अद्यापि पुष्कळच चर्चा: व्हावयाची आहे असा वादग्रस्त उत्तरार्ध त्यापासून वेगळा करून तोही स्वतंत्रपणेंच काढण्यांत आलेला आहे; ही व्यवस्था आमचे वाचक वर्गा सही पसंत पडेल असे मला वाटतें. पण हे दोन्ही भाग सर्व वाचकांनी वाचावेत अशी माझी इच्छा असल्यामुळे ते मिळूनच बांधलेले आहेत. 2 कित्येकांची अशी समजूत असेल, की यांत पुराणांतील सर्व कथा व आख्यानें वाचण्यास मिळावीं; पण चार लक्ष श्लोकांतील कथा एवढ्या लहान पुस्तकांत येणें शक्य नाहीं. नारदपुराणांतील सूचीवरून प्रत्येक पुराणांत काय काय विषय आलेले आहेत हे कळण्यासारखेच आहे. फक्त नारद- पुराणांतील स्कंदपुराणाचीच सूची तेवढी येथें दिलेली नाही. कारण ती फारच लांबलचक असून विशेष महत्त्वाचें असें तींत फारसें नाहीं; फक्त स्थळमाहात्म्यें भरलेली आहेत. नारदपुराणांतील श्रीमद्भागवताच्या सूची- वरून त्यावेळी भागवत आतांप्रमाणेंच होतें अर्से स्पष्ट कळतें; तसेंच भागवतावरचें विवेचन अतिशय सविस्तर असल्यामुळे व ह्यांतील विषय सर्वोस माहीत असल्यामुळे त्याचीही सूची दिलेली नाहीं. नारदपुराणांतील इतर सोळा पुराणांच्या सूचीचें मराठी भाषांतरही दिलेले नाहीं. कारण असें की सूचीचे श्लोक अगदी सोपे असून त्यांतील विषय साधारण मराठी वाचकांसही कळण्यासारखे आहेत; करितां उगाच ग्रंथ वाढवीत वसणे मला इष्ट वाटले नाही. हैं पुस्तक म्हणजे पुराणांतील सर्व महत्त्वाच्या
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/११
Appearance