प्रस्तावना. 16:1 अलीकडे बहुतेक पुराणें छापलेली असल्यामुळे तीं साहजिकपणेंच वाच- यास मिळू लागली आहेत. पुराणें वाचतेवेळी त्यांविषय माहिती देणारें काही तरी निदर्शक म्हणजे गाईड ( Guide ) बरोबर असावें हैं बरें, असें पुष्कळांस हल्लीं वादूं लागलेले आहे. यामुळे मीं हें पुस्तक लिहिलेलें आहे. यांत पूर्वाधत पुराणांविषयीं सामान्य माहिती दिलेली आहे. त्यांतील पहिल्या प्रकरणांत पुराण म्हणजे काय, तें किती प्राचीन आहे, व्यासां पूर्वीचें एक पुराण, व्यासांनंतरची अठरा पुराणे, पुराणांचा व्यासपूर्वग्रंथां- तून एकात्मक उल्लेख, पुराणांचा व्यासोत्तरकालीन ग्रंथांतून अनेकात्मक उल्लेख, पुराणांचा उद्देश व हेतु - विक्रमपूर्व पुराणें - विक्रमोत्तर पुराणें, पुरा-. णांचें सद्यः त्वरूप-पुराणवाचनाची फलश्रुति इत्यादि प्रश्नांविषयीं चर्चा केलेली आहे. दुसऱ्या प्रकरणांत, अठराही पुराणांपैकी प्रत्येक पुराणाचें मास्यपुरा- णोक्त लक्षण व त्याची नारदपुराणोक्त सूची दिलेली असून, त्या सूचीप्रमाणें हल्ली कोणकोणते भाग उपलब्ध आहेत व त्यांपैकी कोणते अनुपलब्ध आहेत; तर्सेच, कोणकोणत्या ग्रंथांत त्या त्या पुराणांचा उल्लेख आहे व त्यावरून प्रत्येक पुराणाविषयी काय अनुमानें निघतात- याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे; शेवर्टी, उपपुराणाविषयीं थोडीशी माहिती दिलेली आहे. याप्रमाणे पूर्वार्धात फक्त पूर्वपरंपरागत माहिती दिलेली आहे. यामुळे त्याविषयीं मतभेदास जागाच उत्पन्न होत नाहीं. उत्तरार्धीत कित्येक गोष्टी जुन्या तऱ्हेच्या मंडळींना पसंत पडण्यासारख्या नसल्यामुळे व त्यांतील
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१०
Appearance