Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. भगवत्याश्च दुर्गायाश्चरितं यत्र विद्यते । तत्तु भागवतं प्रोक्तं; न तु देवीपुराणकम् || शैवपुराण, उत्तरखंड, मध्यमेश्वरमाहात्म्य. हैं वर्णन महापुराणांची गणना करिते वेळी आलेले आहे. शैवपुराणांत ब्राह्म, पाद्म, विष्णु, शैव, देवीभागवत, नारद, मार्केडेय, अग्नि, भविष्य, ब्रह्म- वैवर्त, लिंग, वाराह, स्कांद, वामन, कूर्म, मात्स्य, गारुड व ब्रह्मांड हीं महापुराणें मानिलीं आहेत; यांत विष्णुभागवत महापुराण धरिलें नाहीं. " , हेमाद्रीनें कालिकापुराणांतून खालील उतारा दिलेला आहे:- 'यदिदं कालिकाख्यं तन्मूलं भागवतं स्मृतम् ।' याचा नीळकंठानें तिस- राच अर्थ घेतलेला आहे. तो असाः – 'कालिकाख्य पुराणाचें मूळ देवी- भागवत आहे ' ; असा अर्थ पुराणकाराचा असावा असे वाटत नाहीं. त्यानें विष्णुभागवत व देवीभागवत या दोघांसही पलीकडे सारून स्वतःस मूळ भागवत ' ही पदवी घेतलेली आहे. हेमाद्रि ज्याअर्थी कालिका- पुराणांतून वरील वाक्य उतरून घेत आहे त्याअर्थी : भागवत म्हणून पुढे आलेली त्याच्या वेळीं निदान ३।४ पुराणें तरी असावीत असे वाटतें. ( १ ) विष्णुभागवत, ( २ ) देवीभागवत, ( ३ ) कालिकापुराण व ( ४ ) देवीपुराण. देवीभागवत व देवीपुराण हींही पण भिन्न होत हैं शैवपुराणांतील वरील वाक्यानें स्पष्ट होतें; असो. नीळकंठाची एकंदर प्रमाणे पहातां त्यानें देवीभागवत महापुराण ठरेल असे वाटत नाहीं; कारण देवभागवतानें स्वतःस पकडून दिलेले आहे. वैष्णव भागवतास देवी- भागवताचें नांवही माहीत नाहीं; पण देवीभागवत वै. भागवतास उप- . पुराणांत लेखतें; यावरूनच वै. भागवत प्राचीनतर होय, हे सिद्ध होतें. देवीभागवत महापुराण की वैष्णवभागवत महापुराण याबद्दल संस्कृतमध्यें इतकें वाङ्मय आहे:- ४ , -