या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
[३] तेणें शोके अनन्य आलो शरण तुला हा पाहीं । तरि हरि कृपा करीं । घेइ दयाळा पदरीं ॥ २ ॥ ४ आर्या. आतां प्रभो दयाळा मज दीनावरी करूनिया करुणा || स्वपदाब्जी मन्मानस भृंग रमो उगवूं दे कृपाअरुणा ॥ १ ॥ १ अभंग. तूं आह्मां सोयरा सज्जन सांगाती । तुजलागीं प्रीति चालो सदा ॥ १ ॥ तूं माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग । होसी अंतरंग अंतरीचा ॥ २ ॥ गणगोत मित्र तूं माझे जीवन | अ- नन्य शरण तुझ्या पायीं ॥ ३ ॥ तुका ह्मणे सर्व गुणे तुझा दास । आवंड अभ्यास सदा तुझा ॥ ४ ॥ ६ श्लोक. - ( पृथ्वी. ) - प्रभो शरण आलिया वरि न व्हा कधीं वांकडे ॥ म्हणोनि इतकेच हे स्वहितकृत्य जीवांकडे || प्रसाद करितां नसे पळ विलंब बापा खरें || घनांबू न पडे मुख उघडल्याविना पांखरें ॥ १ ॥ शिवे न तुझिया पदा अदयताख्यदोष क्षण