या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
निवारील || २ || कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दूजा || ३ || कोणाचे इच्छेचे मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥ ४ ॥ कोणावरी आम्ही करावी हे सत्ता । होईल सहाता कोण दूजा |॥ ५ ॥ तुका म्हणे अग| स्वामी सर्व नाणां | दंडवत चरणां तुमच्या देवा ॥ ६ ॥ ५. श्लोक गुरू तूं, बंधू तूं, मम जनक तूं आप्त अवघे । मदें त्वत्पादाब्जी दुरित मन ना धांव झणि घे ॥ कशी होई माझी स्थिति मज कळेना भयहरा | तुझ्या लोभे होऊ मन विमल, शांती-सुखकरा ॥ १ ॥ करुाने नमन तूर्ते, नम्रभावें कृपाळा ॥ शरण तुजचि आलो, दर्शना दे दयाळा ॥ मज तक चरणों ने, जाउं अन्यत्र कोठें ॥ त्यजुनि तुज करें मी, साहुं हे पाप मोठें ॥ २ ॥ तव पदकमलीं म्यां नित्य वस्ती करावी || तव गुण-भजनाची गोडि जीवी धरावी || मनन करुनि तूझें लोभ मोहा हरावें ॥ हृदय विनय- पु - सर्वदा म्यां भरावें ॥ ३॥