Jump to content

पान:पुणें प्रार्थनासमाज त्रयोविंशतितमोत्सव.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २ ) ब्रम्हरूप सागर मनको || बारंबार डुबाओ रे ॥ ४ ॥ निर्मल शीतल लहरें ले ले | आतम ताप बुझाओ रे ॥ ५ ॥ २ दिंडचा. नमन करुनी तुज प्रार्थीि देवराया || देई दर्शन बा दीन तूं नरा या || कोण नुजविण मज अन्य पाळिताहे || कृपादृष्टीनें पूर्ण मला पाहे || १ || प्रभो तुजला मी भक्तिबळे सार्धी || नसे त्याविण मज अन्य ते उपाधी || तरी दासा या भेट दे अनंता || सख्या पार्श्वे मज पूर्णकृपावंता || २ || येई हृदय| मम येई माय- बापा || हारिं माझ्या तूं हारि सकल पापा || छेदि कामादिक षडरि हेतु ताना || गांजलों मी बहु धांव शांतिरूपा ॥ ३ ॥ ३. साक्या. बहु आनंदे बांधव मिळुनी आलो तव सदनासी || होईं तूं गा नित्य विसावा आम्हां दीन जनांसी ॥ १ ॥ नित्य घडो तब मंगल सेवा जे भवतापा नासी ॥ तुझिया भजना वांचुनेि दुसरा छंद नसोच मनासी ॥ २ ॥ ४ अभंग. कोण आम्हां पूसे सिणले भागलें | तुजविण उगले पांडूरंगा || १ || कोणापाशी आम्ही सांगावें सुखदुःख । कोण तान भूक