( ९ ) ध्या रक्षूनियां सज्जनां ॥ त्या त्वां बा प्रतिपालना आमुचिया यावें नगज्जीवना ॥ २ ॥ सद्भावें मन हे तुलाचि विनवी नामा तुझ्या गा- उनी । आहो दुर्बल लेकरें तरि विभो येई झणी धांबुनी ॥ ३ ॥ श्लोक. आलों त्वत्सदनी सबंधुभगिनी या उत्सवाच्या दिनी । उत्साह। धरुनी रमूं निशिदिनीं त्वद्भक्तिच्या साधन ॥ तापार्ते हरुनी सुबुद्धिस मनी देई हृदी राहुनीं । सद्भावा वरुनी प्रणाम करुनी प्रायूँ तुला हे धनी ॥ १ ॥ २ पद. संसारि गुंतलों परि हें मन लागो प्रभु तव चरणीं ॥ धृ० ॥ तुजविण हे मंगल-धामा अन्य म मजला थारा । प्रेमें मी गाउनि कीर्ति आठवितों तव उपकारा || नाम तुझें मजला वाटे अति मधु- रा अमृत धारा । किति तरि मी पापें मळलों । दुर्मदें किति मानें जळलों || सन्मार्गापासुनि वळलों । अति दुःसह माझी करणी ॥ संसारि ० ॥ १ ॥ त्रैकाळी तुजला ध्याती संतमुनी विनटुनि ध्यानीं । ध्यानाविण मार्ग तुझा तो कधि न कळे या भवरानीं ॥ विषयाच्या गोडीने या देहाची होते हानी । काया ही जाइल वायां || सांडिल मन धनसुतजाया । धरि तरि मी दृढ तव पायां ॥ होऊ तुज प्रिय ॥
पान:पुणें प्रार्थनासमाज त्रयोविंशतितमोत्सव.pdf/१०
Appearance