पान:पुणें प्नाथेंनासमाज चतुर्विंशतितमोत्सव.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ध्यान व प्रार्थना. असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्माऽ मृतंगमय । आविराविर्मएधि | रुद्र यत्ते दक्षिणं मुखं । तेन मां पाहि नित्यं ॥ पद. राग तोडी. ० कोणी नाहीं अनंता रे । तूजवीण मला रे || ध्रु० ॥ सांग कुणा मी शरण देवा जाऊं ॥ नसे जननि तात भ्रात || तुजवीण ॥ १ ॥ काम क्रोधाच्या पाशी अडकलों । मुक्त कोण करिल सांग ॥ तूजवीण || २ || मदमत्सरादि अनुदिन गांजिती || सोडवील सांग कोण || तूजवीण || ३ || अंत नको बा पाहूं आतां ॥ होय जिवा तळतळाट || तूजी० ॥ ४ ॥ उपदेश. अभंग-राग जोगी. बुद्धीचा पालट धरारे कांहीं । मागुता नाही मनुष्य देह ॥ १ ॥ आपुल्या हिताचे न होता सायास | गृहदारा आस धनवित्त ॥२॥ अवचितें निधान लागले हे हाती | भोगावी विपत्ति गर्भवास ॥ ३ ॥