पान:पुणें प्नाथेंनासमाज चतुर्विंशतितमोत्सव.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२ ) उद्बोधन पद. - राग यमन, - प्रभुराय तो या गडे संपादूं ॥ ध्रु० ॥ प्रेम जयाचें वाढवी प्रिया । जनका त्यापुढें बागडूं || प्रभु० || १ || स्नेह जयाचा सन्मति देई । आपुल्या त्या सख्या आळवूं || प्रभु० ॥ २ ॥ भोगूं जयाची संपत्ति सुर्खे । अमुच्या त्य। धन्या आर्जवूं || प्रभु० || ३ || होय आह्मांत सर्वहि तोची । आसरा सर्वथा त्या करूं ॥ प्रभु० ॥ ४ ॥ स्तवन पद- राग भूप. क्षणभरि करुनी स्थिर चित्ता | शरण चला श्री भगवंता ॥ ध्रु० ॥ सकळ चराचर या जगताचा | अतुल प्रतापी तोचि नियंता ॥ १ ॥ भक्तांना निज हात देउनी । भवसागरि जो गति दाता ॥ २ ॥ ज्याचा महिमा अपार जगतीं । यकली वाणी वर्णन करितां ॥ ३ ॥ अनन्य शरणा गत देखोनिया | पूर्ण दयाघन तो सुखदाता ॥ ४ ॥