Jump to content

पान:पुणें प्नाथेंनासमाज चतुर्विंशतितमोत्सव.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १० ) पृथ्वी. अगा प्रणत-वत्सला म्हणति त्या जनां पावला । म्हणूनि तुम- च्याच मी स्मरतमें सदां पावलां || करा वरि कृपा हरा व्यसन, दीन हा तापला । असे मनि धरा खरा भरंवसा मला आपला ॥१॥ म्हणा मज उताविळा गुणचि घेतला घाबरें । असो मन असे- चि बा भजक वत्सला रे बरें || दिसे क्षणिक सर्व हे भरंवसा घडी. चा कसें । घरील मन अधिनें बहु परिभ्र में चाकसें ॥ २ ॥ दिंडया. आज सौख्याचा दिवस पूर्ण जाणा । म्हणुनि आनंदें गाउं देवराणा || ज्यासि म्हणताती पूर्ण दयासिंधू । दीन दासांचा माय बाप बंधू ॥ १ ॥ तोचि परमेश्वर भक्तजना तारी । > ज्याचि सत्ता विख्यात जगा सारी || नया इच्छेने सर्व होय कांही । तया वांचुनियां देव दुजा नाही ॥ २ ॥ श्लोक. - उपेंद्रवजा. - म्हणुनि भगिनि बंधू सर्व आजी मिळोनी ।