या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पुणे प्रार्थनासमाज चतुर्विंशतितमोत्सव. रविवार, ता० २ डिसेंबर १८९४ इसवी. संध्याकाळच्या आराधनेचा क्रम. भजन. १ श्लोक - शार्दूल विक्रीडित प्रारंभ करुनी प्रणाम शिरसा राजाधिराजा तुला || आम्ही बंधु मिळोनि उत्सव करूं सप्रेम हे निर्मला || व्हावें साझ म्हणोनि या ॥ सुसमय आरंभिली प्रार्थना ॥ यावें होउनि सुप्रसन्न सकलां द्यावें प्रभो दर्शना ॥ १ ॥ जो तूं मोक्षपदासि नेसि अवध्या रक्षूनियां सज्जनां ॥ त्या त्वां बा प्रतिपालना आमुचिया यावें नगज्जीवना || सद्भावें मन हें तुलाचि विनवी नामा तुझ्या गाउनी ॥ आर्हो दुर्बल लेंकरें तरि विभो येईं झणी धांबुनी ॥ २ ॥