पहिलें प्यूनिक युद्ध सुरू झालें. प्यूनिक शब्दाची व्युत्पत्तीही मनोरम आहे. फिनिशिअन या शब्दापैकीं फिनि म्हणजे पिनि अथवा प्यूनि एवढाच शब्द रोमन लोकांनीं त्या लोकांचा वाचक म्हणून ध्यानांत ठेवला व त्यापासून प्यूनिक असें विशेषण बनविलें. हें युद्ध सिसिली बेटांत झालें. कार्थेजवाल्यांचा पराभव झाला. समुद्र ओलांडून रोमन लोक कार्थेजवर आले. कार्थेजवाले त्यांना इतके कमकुवत वाटले कीं, त्यांनीं आपली निम्मी फौज घरी पाठवून दिली. हें पाहतांच कार्थेजवाले जोरानें उलटले व त्यांनी रोमन लोकांचा फन्ना उडविला. अशी यशापयशाची देवघेव होतां होता हॅमिलकर बार्का, कीं जो एक सुफेती होता, त्यानें मोठा पराक्रम करून रोमन लोकांस सिसिली बेटांतून परत हांकून लाविलें. इतक्यांत खुद्द कार्थेज शहरांत बंडे उपस्थित झाली. भाडोत्री फौजा आपल्या पगाराच्या थकलेल्या बाक्यांसाठीं राजद्वारीं धरणें धरून बसल्या. शेवटीं कंटाळून हा शूर हॅमिलकर स्पेन देशास निघून गेला. तेथे एक "नवें कार्थेज" नांवाचें शहर आगाऊच स्थापन झालें होतें. हॅमिलकर याचा हेतु असा होता कीं, तेथें राहून स्पेनच्या द्वीपकल्पांत आपली सत्ता कायम करावी; व तेथून रोमन लोकांच्या सत्तेस शह द्यावा. या हॅमिलकरच्या मनांत रोमन लोकांबद्दलचा द्वेष इतका बाणला होता कीं, एके दिवशीं, त्यानें अग्नीस साक्षी ठेवून आपल्या दहा वर्षांच्या मुलाला म्हणजेच हॅनिबलला अशी शपथ घ्यावयाला लाविली कीं, "मी मरेपर्यंत रोमन लोकांचा द्वेषच करीत राहीन." हॅमिलकरच्याने पुढे फारसें कांहीं झालें नाहीं; पण बापाची इच्छा मुलानें तृप्त केली.
हॅमिलकर वारला तेव्हां हॅनिबल लहान होता. म्हणून हॅमिल्करचा जांवई हॅज्ड्रूबल हा कारभार पाहूं लागला आणि स्पेन देशांत कार्थेजेनिअन लोकांचें सामर्थ्य वाढविण्याची त्यानें पराकाष्ठा केली. थोड्याच
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/३४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९
हॅनिबल