चाकर आणि सरदारांचे जनाने यांच्यांत भयानें एकच आरोळी उठली, सरदारांनीं आवर घालण्याचा खूप यत्न केला; पण कांहीं केल्या माणसांची धांवपळ थांबेचना. त्यांनीं प्रतिकाराचाही थोडा डौल घातला पण सोबेस्कीनें तो हां हां म्हणतां मोडून पाडला. तुर्कांचा पराभव झाला. आणि शत्रु पाठीवर घेऊन ते बारा वाटा पळत सुटले. सोबेस्कीनें नुसती लांडगेतोड केली.
पोलीश लोकांना वाटलें देवानें आपल्याला नवा रक्षक दिला. मध्यंतरी राजा कोणास निवडावें म्हणून वॉरशॉ शहरीं पुष्कळ खळबळी चालू होत्या. तुर्कांनी पुन्हा एकदां डोके वर केलें. यावेळी सोबेस्कीपाशीं केवळ वीस हजार फौज होती. पण या लहानशा फौजेची फिरवाफिरव त्यानें इतक्या हिकमतीने चालविली होती कीं, तुर्कांस नामोहरम होऊन पुन्हा परतावें लागलें. वॉरशॉ शहरची गादी कोणा द्यावी याची भवति न भवति होऊन या रणधुरंधर व खानदानीच्या घराण्यांतील शूर शिपायास लोकांनीं गादीवर बसविलें. सोबेस्कीच्या चरित्रांतील हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होय. तुर्कांशी झुंजतांना जगावयाचें कीं मरावयाचें हा प्रश्न केवळ पोलंडपुढेच काय, पण अवघ्या युरोपखंडापुढे उभा होता. आणि तुर्कांचा नायनाट करण्याचा चंग बांधलेला सेनापति गादीवर आणून पोलंडने या तुर्की झगड्याचा कायमचा सोक्षमोक्ष करण्याची जबाबदारी आपल्यावर घेतली.
तुर्कानें पुढें मोठें कारस्थान केलें. धाकदपटशा दाखवून त्यानें मोठी मसलत रचली. पोलंड आणि तुर्क यांच्यामध्ये ऑस्ट्रिया देशाचा हॅप्सबूर्ग राजा होता. भोवतालचे अनेक स्वकीय तुर्कांस मिळालेले पाहून तो भयानें अगदीं गांगरला. तुर्कांची तयारी फार मोठी चालू होती. लक्षावधि फौजा व मोठा पोक्त सरंजाम त्यांनी जमा केला. आणि इ० सन १६६३ सालच्या जून महिन्याच्या तिसाव्या तारखेस तुर्क लोकांचें प्रचंड लष्कर आपल्या अवाढव्य लवाजम्यासह सध्यां
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१७७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७३
जॉन सोबेस्की