Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 जॉन सोबेस्की

जॉन सोबेस्की हा ई० सन १६२९ साली जन्मला. शिवाजी इ० सन १६३० साली जन्मला. सोबेस्कीच्या मागोमाग शिवाजीचें नांव सांगण्यांत मुद्दा आहे. शिवाजीचा जीवितहेतु म्हणने दक्षिण हिंदुस्थानांत आधींच माजलेल्या व हळुहळू सर्व दक्षिणेंत पसरत चाललेल्या मुसलमानी सत्तेचा विध्वंस हा होय. जॉन सोबेस्की याच्या जीविताचा हेतुही यूरोपांत पसरत चाललेल्या मुसलमानी आक्रमणाला जोराचा तडाखा देऊन यूरोप तुर्की अंमलांतून मुक्त करणें हाच होय. ज्या दोघांची कामगिरी इतकी सारखी, ते दोघे कालदृष्ट्या जुळे असावे हेंही मुसलमानी सत्तेच्या अभ्यासाच्या दृष्टीनें महत्त्वाचें ठरेल. पण जीवितांत समान हेतु असणे येवढेंच सारखेपण या उभयतांत नाहीं. जसे शिवाजीमहाराज तसा सोबेस्की सामान्य सरदार घराण्यांतीलच होता व आपल्या पराक्रमाच्या बळावर जसे शिवाजीमहाराज महाराष्ट्राचे राजे झाले तसाच जॉन सोबेस्की हा आपल्या बळावर पोलंड देशचा राजा झाला. लहानपणापासून खास गृहशिक्षणांतसुद्धां मुसलमानांचा द्वेष हा जसा महाराजांच्या रोमरोमी भिनला होता तसा तुर्कांचा म्हणजे मुसलमानांचाच द्वेष हा वारशाच्या रूपानें सोबेस्की यास बापाकडून मिळाला होता. असें सांगतात कीं, रोमन लोकांचा महान् द्वेष्टा हॅमिलकर यानें मरतांना आपल्या दहा वर्षांच्या मुलास म्हणजे हॅनिबॉल यास अग्निकुंडापुढे उभे केलें व शपथ ध्यावयास लाविली कीं, 'रोमन लोकांचा मी प्राणान्त द्वेष करीन'. हें जसें हॅमिलकर यानें केलें होतें व शिवाजीमहाराजांच्या घरीं जसें त्यांस शिकविलें गेलें, तसेंच जॉन सोबेस्की यास त्याच्या लहानपणींच बापानें शिकविलें होतें. हिंदुधर्माचा उच्छेद हें दक्षिण-
 पु... १३