पान:पायवाट (Payvat).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वरूप तंत्रवादी होणे भागच असते. निवेदन बाजूला सारून, कलावंताचा अनुभव काय हे नजरेआड करून माध्यमांच्या रचनेतून जी समीक्षा साकार होऊ पाहते, ती तांत्रिकच राहणार. वा.लं.चे जसे फडक्यांच्या तंत्रवादाशी जुळणारे नाही, तसे त्यांचे मर्टेकरांच्या तंत्रवादाशीही जुळणारे नाही. कारण मुळात कोणत्याच तंत्रवादाशी त्यांचे मन जुळू शकणारे नाही. मला वाटते, मराठी टीकाकारांत वा.लं.चा हा एक लक्षणीय विशेष आहे.
 ललित वाङ्मयकृतीचे कार्य, तिचे प्रयोजन- माध्यमामधून एक अनुभव साक्षात करणे हे असते. जीवनाचा व्यवहार अनुभवांच्यावर विधाने आधारून अनुभवांचे स्पष्टीकरण करीत किंवा या विधानांची संगती जोडीत चाललेला असतो. ललित वाङ्मय या सर्वसामान्य व्यवहारापेक्षा थोडे निराळे असते. ते अनुभवच साक्षात करीत असते. हा अनुभव साक्षात करणे हे ललित वाङ्मयात भाषेचे काम असते. या अनुभवाचा जिवंतपणा, त्याचे अनेकपदरी स्वरूप, त्याच्या ठिकाणी असणारे अनन्यसाधारणत्व, अनेकसंदर्भसूचकत्व जसेच्या तसे सांभाळण्याचे काम भाषेने केले पाहिजे. हा मुद्दा वा.लं.च्या एकूण विवेचनातील मध्यवर्ती मुद्दा आहे. ललित वाङ्मयातून अभिव्यक्त होणारा हा अनुभव सलग असतो, एकजीव असतो, उत्कट असतो व मूल्यवान असतो, ही भूमिका एकदा घेतल्यानंतर जीवनाचा संदर्भ टाळता येणे कठीणच होऊन जाते. कारण ललित वाङ्मय जो अनुभव साक्षात करील, तो जीवनाच्या कक्षेतीलच असणार. त्या अनुभवाच्या ठिकाणी जे अनेकसंदर्भसूचकत्व येणार, ते पुन्हा एकूण जीवनाच्या प्रवाहात या अनुभवाचे स्थान निश्चित करतानाच येणार. वा.लं.नीच या बाबत आर्थर कोइस्टर एके ठिकाणी उद्धत केला आहे. ते म्हणतात, " तेव्हा कादंबरी म्हटली म्हणजे तिने केवळ एखाद्या जीवनावंडाची वास्तव पुनर्निर्मिती करून भागत नाही. तर त्या जीवनखंडाचे एकूण जीवनप्रवाहातील स्थान तिने निश्चित केले पाहिजे." हे असे होते याचे कारण अनुभवाच्या जिवंतपणावर वा.लं.ची श्रद्धा आहे. शेवटी अनुभवाचा सलगपणा आणि जिवंतपणा हा पाया गृहीत धरणारा टीकाकार ललित वाङ्मयात अभिव्यक्त झालेल्या अनुभवाची अपरिहार्यता व दर्शनाची समर्थनीयता पाहणार. वाङ्मयात काहीतरी पटत जात असते, निदान पटल्यासारखे वाटत असते- या वा.लं.च्या म्हणण्याचा हाच अर्थ. जीवनाच्या संदर्भात कलाकृतीकडे पाहणे, कलाकृतीकड़न जीवनाच्या आकलन-अवलोकनाची, त्यावरील निरूपणाची, हे सारे साकार झालेल्या 'सलग अनुभवा'त पाहण्याची वा.लं.ना होस वाटते ती यामुळेच. हा जीवनाचा संदर्भ टाळण्याचा एकच मार्ग असतो व ता म्हणजे तंत्रवादी होणे. वा.ल. तंत्रवादी नाहीत, म्हणून त्यांच्या समीक्षेला जीवनाचा संदर्भ टाळता येणे शक्य नाही.

 म्हणूनच वा. ल. कुलकर्णी नाविन्याचा केवळ नावीन्य म्हणून पुरस्कार करू शकत नाहीत. मनोविश्लेषणाचे प्रयोग करू इच्छिणाऱ्या 'रात्रीचा दिवस 'सारख्या कादंबरीत ते रमू शकत नाहीत. नवकाव्याच्या सत्काराला ते उत्सुक होते याचे कारण नव्या प्रतिमा नव्हेत, तिरकसपणा नव्हे अगर दुर्बोधपणाही नव्हे. पंचेचाळीसपूर्वीचे

५२ पायवाट