या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जीवनवादी भूमिका बाद झाली असे समजता येणेही शक्य नाही. गेल्या दशकातील मराठी समीक्षेच्या संदर्भात व्यक्तींची नावे बाजूला ठेवली, तर मला जाणवणाऱ्या प्रवृत्तींबाबतची माझी प्रतिक्रिया ही आहे. हे सारे विवेचन आपण मान्य करावे असा माझा मुळीच आग्रह नाही. कारण या क्षेत्रातील ' विषय' निर्विवाद अवस्थेत जाण्याचा संभव कमी आहे. तेव्हा विषयाची विवाद्यता विवाद्य स्वरूपातच ठेवून मला थांबले पाहिजे.
आलोचना, डिसेंबर १९७२