पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० पानसे घराण्याचा इतिहास. ११ ज्या जहागिरी आधक अलीकडच्या काळच्या आहेत त्यांचे बाबतीत मिस्तर मिल्स यांनी दुसरी एक चूक केली आहे. ती अशी की, ज्या मिळकती मिस्तर एलफिन्स्टन याने मूळचे शिफारसींत वंशपरंपरेच्या असे लिहिले आहे, त्या मिळकती वंशपरंपरेने चालवाव्या असा आम्ही ठराव केल्याचे कळविले आहे. परंतु आमचा उद्देश, आम्ही त्याविरुद्ध फक्त असा कळविला आहे की, ज्या पत्राचा जवाव आम्हीं लिहीत आहों, त्यापत्रासाबत पाठविलेले () जेथे जहागिरदारांचे कमी हिताचे असतील तेथे दोहों पटापैकी कोणते पटाप्रमाणे वागावे असे विचारपूर्वक मनांत आणावयाकरितां मिस्तर एलफिन्स्टनचे पट त्या पटासी मिळवून पाहावें. | १२ ज्या सरंजामांचे देहनश्यांची तारीख सन १७५१ च्या पुढची आहे, ते सरंजाम पेशव्यांचे मुलुख सर झाल्यापासून दुसरी पिढी गुजरल्यावर खालसांत करून त्याचे पुढले पिढीस त्या सरंजामाचे निव्वळ उत्पन्नाचे निम्में पैनशन तहहयान द्यावे, हा सर्वसाधारण नियम आहे. परंतु, ज्या प्रकरणांत मिस्तर एलफिन्स्टन यांनी अधिक दूर काळापर्यंत गुजरायाची तजवीज करण्याविषयी सिफारस केली असेल, त्या प्रकरणांत दरोबस्त सरंजामाचे अगर त्याचे एक भागाचे उपभोगाची मालकी आणखी मुदतपर्यंत वाढवून, वर लिहिलेले नियम सोडून वागण्यास, सरंजाम दाराचे घराण्याच्या नौकन्या अगर योग्यता येणे करून, अगर जी लोकप्रीतीचे कृत्य केले तर होत आहे तेणेकरून, पाहिजे तितके कारण होते किंवा कसे याचा पक्का विचार तुम्हीं व गव्हरनर जनरल इन-कौल्सिल यांनी करावा. है नियम सोडून वागणे आम्ही औदार्यत्वानें फर्मावत; व जेथे जेथे अशाच कारणांनी तसे च वागण्याची शिफारस होईल तेथे तसे वागण्याविषयी आम्ही हुकूम देऊ. आणखी तर काय ? परंतु ज्या प्रकरणी मिस्तर एलफिन्स्टन याने विशेष शिफारस केली नाहीं त्या प्रकरणी सुद्धा आम्ही तसे वागण्याचा हुकूम करू. | १३ वंश परंपरेचे जहागिरी करितां जहागिरदारांस दत्तक घेण्याचे बाबतीत मिस्तर मिल्स याने जी शिफारस केली आहे, ती आम्ही अगदीं कबूल करू शकत नाहीं. दत्तक घेतलेल्या वारसाचा उत्तराधिकारावरून हक्क कबूल करूं नये व दत्तक घेण्याची परवानगी एक वाक्षसी म्णोन जहागिरदारांचे जातीची योग्यता व सरकारी निमकहलाली याबद्दल मात्र द्यावी, असे जे हुकूम आम्ही पुन्हा पुन्हा दिल्हे आहेत ते धरून बागावे म्हणजे जाहले. पुढील दोबस्त उत्राधिकारांवर नजराणे बसवावे, असी जी मिस्तर मिल्स यांची आणखी सूचना तुम्ही विशेषेकरून आमचे कानावर घातली, तिचेप्रमाणे हि आम्हांस करितां येत नाही. ज्या सरंजामाबद्दल दत्तक वारस होण्याची परवानगी आहे त्या सरंजामास उत्तराधिकारी होणा-यावर मात्र नजराणा बसविण्याचा आहे. [ पानसे यांचे सरंजामी उत्पन्न कोणते निमित्त लावून कमी केले हे वरलि मजकुरावरून लक्षात येईल. ]