पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण आठवें. १. श्रीमंत रावबाजींची पानशांवर इतराजी. श्रीमंत बाजीराव रघुनाथ पेशवे हे अनिश्चित मनाचे पुरुष होते; शिवाय त्यांच्या भोंवतीं हलक्या मनाच्या लोकांचा गराडा नेहमी असे. राष्ट्राचा अधःपात व्हावयाची वेळ आली म्हणजे राष्ट्रांत स्वार्थी, अदूरदृष्टि व स्वदेशावमानी लोकांचा भरणा व्हावयाचा असा एक अबाधित नियम आहे. तो नियम या काळीं म्हणजे शके १७२२-२३ च्या सुमाराम, मराठी साम्राज्यास लागू पडलेला दृग्गोचर होतो. * खूप शर्तीने राज्य राखणाच्या नाना " चा अंत होऊन गेला व मग पुणे दरबारांत सारे स्वार्थी लोकांचे मंडळ उरलें, या काळचा इतिहास अद्यापि पूर्णपणे उपलब्ध झाला नसल्याने त्याच्या तपशिलांत न शिरण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यामुळे फक्त जेथे जेथे पानसे घराण्याचा संबंध येईल तेवढी च हकीकत यापुढे देण्यात येईल. | तुकोजी होळकर हे आपल्या आयुष्याच्या अखेरी अखेरीस नानांना पूर्णपणे मिळून त्यांच्या तंत्राने चालत होते. त्यामुळे त्यांच्यावर श्रीमंत बाजीरावसाहेबांचा कायमचा रोष झाला. या दोन घराण्यांतील हे वितुष्ट नानांच्या पश्चात् फार विकोपास गेले. त्याचा परिणाम यशवंतराव होळकरांनी धीट बनून पुण्यावर स्वारी केली व पुण्यास आग लावून दिली. त्यावेळी यशवंतरावाने पुणे शहरास फार त्रास दिला. पुणे शहरावर खंडणी तर बसविण्यांत आली च होती, पण पुण्याच्या आसपासच्या गांवांतून हि खंडणी वसूल करण्यांत आली. दिवे येथे, या वेळी सखाराम बापूजी पानसे यांच्या जमाखर्चात पुढील उल्लेख आलेला आहे. * शके १७२४ दुंदुभनाम संवत्सरे पौष मास १० रुपये होळकर यशवंतराव यांचे खंडणीबद्दल दिले. तसें च * शके १७२४ फाल्गुन मास होळकरांचे खंडणीबद्दल जाधवांनीं शिपाई दारी बसविला त्याचे सिध्याबद्दल एक रोजचे चार आणे ४४ . सारांश, यशवंतराव होळकरांचा चटका खुद्द पुण्यास जरी बराच बसला, तरी त्याची थोडी फार झळ पुण्याच्या आसपासच्या गांवांस हि लागली. वरील हकीकत खुद्द पुणे व त्याचे आसपासचे मुलुखाबद्दलची आहे. परंतु, नगर, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, सातारा वगैरे भागांत होळकराचे सैन्य टोळ्याटोळ्यांनीं घुसून गांवोगांव लुटालूट व जाळपोळ करून शिवाय जबरदस्तीने खंडणी हि वसूल करीत होते. या सैन्यांत बाळकृष्ण गंगाधर व जिवाजी यशवंत हे प्रमुख होते. यांचे पारिपत्य करण्याकरितां पुण्याहून गणपतराव पानसे व बापू गोखले यांची रवा