पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुकानदाराने व्यवस्थित रेकॉर्ड करून ठेवलं आहे की, अवघ्या आठच दिवसांपूर्वी ठकुबाईच्या भावानं पन्नास किलो गहू कुपनावर उचललाय. त्यामुळे ऑफिशियली हा भूकबळी ठरत नाही.... तसा रिपोर्ट मी केला आहे सर कालच... पण माझं मन मला टोचणी देतंय - हे बरोबर नाही - हा खराच भूकबळी आहे.. मी फार अस्वस्थ आहे सर....!"

 शिंदेची समजूत घालून मी त्याला पाठ्यून दिलं, पण मीही त्याच्याएवढाच अस्वस्थ झालो. ठकुवाईचा भूकबळी ख-या अर्थाने होता का नव्हता हें मला फिल्डबर न जाता सांगता येणं कठीण होतं, पण त्यामुळे या वर्षी जिल्ह्याला दुष्काळानं केवढा जबरी तडाखा दिला आहे, याची तीव्रता मात्र त्याचं गांभीर्य अधोरेखित करून गेली.

 ...आणि माझा निर्णय झाला होता. प्राप्त परिस्थितीमध्ये पुढील संभाव्य भूकबळी टाळायचे असतील तर योजनाबाह्य रस्ते मंजूर करण्याव्यतिरिक्त कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता! आणि त्याच्या जोडीला कुपनावर मजुरांना धान्य मिळण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस कामावर जाऊन रेशन दुकानदाराने धान्य वाटप करावे असा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे, हा मार्ग मला सापडला. यात फार मोठा धोका होता - ओ. एस. डी. यंदे यामध्ये कोलदांडा घालेल अशी शक्यता नव्हे, खात्रीच होती, तरीही मी आज हा धोका घेण्यासाठी तयार झालो होतो. माझ्यातील संभ्रमित अर्जुनाला मीच कृष्ण होऊन तयार केलं होतं.

 मी कलेक्टर भावे साहेबांशी सविस्तर बोललो. ते तात्काळ सहमत झाले. योजनाबाह्य रस्ते जिल्हापातळीवरच मंजूर करून आयुक्ताकडे कार्योत्तर मंजुरीला पाठवायचे व कुपनावर धान्य वाटपासाठी आठवड्यातून दोन दिवस प्रत्यक्ष कामाच्या जागी रेशन दुकानदारांनी जाऊन धान्य वाटप करायचं या दोन्ही गोष्टींना भावे साहेबांनी मान्यता दिली.

 'सर...' मी उठता उठता माझ्या मनातली भीती व्यक्त केली, 'मी एक छोटा अधिकारी- डेप्युटी कलेक्टर आहे... उद्या न जाणो यात चौकशी झाली तर आय फिअर.. माझं करिअर धोक्यात येऊ शकतं सर....!"

 'डोंट वरी देशमुख.... हा निर्णय तुमचा एकट्याचा नाही. फायनल अॅथॉरिटी म्हणून मीच सही करतोय ना... कारण फाईलवर हे सारं स्पष्ट लिहायचं. आणि मी यात तुमच्या बरोबर आहे... आय लाईक युयर अॅटिट्यूड.. मी स्वतःला कॉपीबुक कलेक्टर समजतो. नियमाच्या पलीकडे मी कधीच जात नाही पण हा प्रसंगच असा

हमी ? फसली हमी ? / ९३