पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/125

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 भय्या मात्र त्यावेळी तालुक्याला सभापतीसमवेत नळयोजनेच्या टेंडरची देवाणघेवाण व उपसभापतिपदासाठी खलबत करीत होता, तर घरी झोपाळ्यावर मंद झोके घेत तलख मेंदूचे बाप्पासाहेब स्वतःशीच मंदपणे हसत आपल्या टकलावरून हळुवारपणे हात फिरवत होते.

 गावामध्ये मृगजळाप्रमाणे लखलखणारं हिरवकंच रंगभरित स्वप्न मृगजळाप्रमाणेच पाहाता पाहाता विरून गेलं होतं.

☐☐☐

मृगजळ / १२३