Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाणिपतची बखर १७ अनुभवून सुखरूप राहाणे, जाजती उपद्रव मुलुखास व बादशाह स द्यावयाची गरज नाहीं. नर्मदा दक्षणतीरापासून पलीकडील हद्द तुम्ही आपली संरक्षण करून असावे. आणखी तुमचे फौजेस घासदाण्याबद्दल दोन कोटी रुपये वा एक कोटी रुपये स्वारीखर्च, येणेप्रमाणे रोख देऊन, बादशाही सनद नवीन करून देतो. त्याबरहुकूम घेऊन बादशाहाची नोकरी करीत जाणे. हा करार असल्यास सलूख संपादिला जाईल. ही गोष्ट तुमचे खातरीस न येई तरि लढाई करावी लागेल. याचा पक्केपणे विचार करून, सांगितलेल्या गोष्टी मान्य असल्यास लिहून पाठवाव्या. त्यासारिखे आम्ही बादशाहाची खातरजमा करून येतों. सेवकपणाचे धर्माने बादशाहाचे पायांजवळ वर्तणूक करून, वादशाहाचे खिजमतीत' एक साल राहून, सरफराई करून घेणे. जिद है। वाढविल्यास कामास येणार नाही. त्यांत तुम्ही माकूल ४ आहां." १३. 'बंदोबस्त करणें तो आम्हींच करू । याप्रमाणे सर्व मजकर इराणीच्या वकिलांनी सदाशिवपंतांस समजाविला. ता मजकूर सदाशिवपंतांनीं श्रवण करून, मातबर सरदार व मल्हारजी हळकर यांचे विचारें ठरवन सांगितले की, " हिदुपत बादशाही येथील बदोबस्त करणें तो आम्हीच करू. तुम्ही पर-पादशाहीचे असतां आपली हद्द " टाकून मनसूरअली व सुजात दौले यांचे विचारें हावभरी होऊन आलीवड आला. मागे तुम्हीच येऊन अगदीं बादशाही बुडविली. हल्लीं मिराबुबु बेगम यांचे अनुमते येऊन व्यर्थ दंगा आरंभिला. ही गोष्ट इनसान नव्हे. आलां ते समयीं आम्ही असतों तर बादशाहीची खराबी होऊ न देतों. ता तुम्ही आमचे मसलतीस अडथळा करणार कोण ? आमचे चित्तास प्रमाणेच करावयास श्रीमंत नानासाहेब समर्थ आहेत. रूमशामची आम्ही घेणार, येथे तुमचा मजकूर कोठे ? तुम्हीं आल्या मार्गे उतरून जावे. भाईचारा राखावयाचा असल्यास लौकर फौजेसुद्धा (१) खिजमत-चाकरी, (२) सरफराई-शिफारस, गौरव, (३) जिद-- - ९l. (४) माकल-उचित. समंजस, (५) इनसान-न्यायाची, (६) ३. १७३९ मधील नादिरशहाच्या स्वारीचा हा उल्लेख आहे. (७) जकूर-किमत, (८) भाईचारा-बंधुवारा मोहरा ३१ । । ६) छ, वधे । र जौ, ४११ ० येईल त्याप्रमाणेच करावया जि६, हेका. (