रघुनाथ यादव-विरचित जागा, अमदानगर व कर्नाटक काबीज करून हैदराबादेस मोर्चे लाविले. सहा सुभे दक्षणचे किलिजखां मुतालक व फत्तेजंग बहादूर व तोलेजंग बहादूर व शिद्दी अमीर वगैरे बादशाहाजादे दिवसेंदिवस खाली आणले व बहाणपूरकर व औरंगाबाद व सोंदे बिदनूर व त्रिचनापल्ली व श्रीरंगपट्टण व मछलीबंदर व समुद्रतीर व गोमांतक व तमाम कोंकण व खंबायत अवांतर समुद्रातील किल्ले महाकुबल जागा, एका परीस एक बांक्या सुरंज, गढेमंडळे, खानदेश, नेमाड, व मनमाड व व-हाड व खेचीवाडा व हडोती मुलूख काव्या-दाव्याने सर करून, हावभरी भरून, दिल्लीस हिंदूपत बादशाहा बसवून, बेवीस उमराव पिढीजादे नांव बिनांव केलेले, तुमच्या दहशतीने कितीक मांडलिक राजे आपल्या जागा सोडून, फकीर होऊन देशांतरास गेले. सर्व बादशाही, तुम्ही मराठियांनी वेकैदी करून बुडविली. अलमगीर बादशाचे वेळेचे नामी नामी उमराव शास्तेखां व अस्तखां व झुलपुकरखां नवाब नसरतजंग व हिमतखा व फत्तेसिंह व मनसूर अलीखां पठाण व खानखां व इम्रामखां व हफ्तहजारी जामत अलीखां व फर्दुल्लाखां व फत्तेखा व हसनखां व रणमस्तखां व महमदखा व खावंदखां व कासमखां व किलिजखां, जैसिंग व संग्राम सिग, जोरावरिसंग व महिपतसिग, असे थोथोर यांचे बेटे व भाई व जांवई यांस गर्दीस मिळवून नेस्तनाबूद केले. तसा हा मजकूर नव्हे. एवढी बादशाही, अनादि तक्ता याच तक्तावर युधिष्ठिर बसत होते, ते तक्त तुम्हीं फोडून बादशाहा परागंदा करवून, आणखी अटकपार होऊन, रूमशामची बादशायत घ्यावयाची मसलत करून, तेथीलही सरदेशमुखीची कैदकानू बसवून हक्क घेऊ पाहतां. यांत कोणती किफायत: आपण पाहिलीत ? पेशजी बादशाहा कृपावंत होऊन साडेसहा सुभं दक्षणेतील सरदेशमुखी तुम्हास करार करून दिल्ही, तो वंत७ _१,२.२७ (१) सहासुभे-औरंगाबाद, व-हाड, खानदेश, विजापूर, गोवळकोंडे व बेदर. (२) कुवल-मजबूत, (३) बांक्या-दुःसाध्य, (४) कावादावा-कपट, (५) पुणे प्रत १ हपतीत, भिवंडीप्रत-हैपतीन, नागपूर प्रत-इतप्ते. मूळ शब्द कळला नाही म्हणजे वेडेवाकडे रूपांतर कसे होते याचे हे उदाहरण असे का. ना. साने म्हणतात. हफ्तहजारी-सप्तसहस्त्री ७ हजार स्वारांचा सरदार, (६) किफायत-फायदा, (७) वंत-वाटा.
पान:पाणिपतची बखर.pdf/61
Appearance