पान:पाकिस्तानचे संकट.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास बिगर-मुसलमान मतदारसंघांत जागा राखून ठेवण्याची प्रथा पडून, मद्रासच्या बिगर-मुसलमान मतदारसंघातर्फे निवड्न येणाऱ्या ६५ प्रतिनिधींपैकी २८ ब्राह्मणेतर प्रतिनिधी या राखीव पद्धतीने यावे असें ठरलें! मुंबई इलाख्यांत ४६ बिगर-मुसलमान जागांपैकी ७ जागा मराठ्यांच्या राखीव ठरल्या! अस्पृश्यांच्या प्रतिनिधींची नेमणूक गव्हर्नरांनी करावी असे ठरले. कामगारांच्या प्रतिनिधींना हाच न्याय लागू करण्यांत आला. हिंदी ख्रिस्ती, अँग्लो इंडियन व युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची सूचना माँटफर्ड-अहवालांत नव्हती! कायद्यांत ती सोय झाली! संस्थानिकांनी साम्राज्य सरकारला यद्धांत मदत केलीच होती. ब्रिटिश भारतांत वाढू पाहणाऱ्या जबाबदारीच्या राज्यपद्धतीला लगाम घालण्याचे एक साधन म्हणून पुढे मागें संस्थानिकांचा. उपयोग करता येईल हे ओळखून, माँटफर्ड-अहवालांत संस्थानिकांचें महिम्नस्तोत्र रचण्यांत आले व १९२१साली 'प्रिन्सेस चेंबरची' प्राणप्रतिष्ठा करण्यांत आली! साम्राज्याच्या हिताच्या दृष्टीने उठविण्यांत आलेली ही भुतावळ साम्राज्यावरच कशी उलटविता येईल व तिचाहि उपयोग राष्ट्रहिताच्या वाढीसाठी कसा करता येईल हा राष्ट्रनेत्यांनी हाती घेण्याचा यापुढील प्रश्न होता. १९१४ च्या महायुद्धाचा हेतु 'युद्धांची परिसमाप्ति करण्यासाठी चाललेलें युद्ध' असा सांगण्यात येत होता; पण, व्हर्सायच्या तहानेंच नव्या युद्धाची बीजे पेरून ठेविली होती. राष्ट्रांतील अंतस्थ कलह आंवरून धरणे, राजकीय प्रगतीचे टप्पे झपाट्याने गांठीत जाणे व नवें जागतिक युद्ध सुरू होण्याच्या सुमारास सारें राष्ट्र स्वातंत्र्योन्मुख व स्वसंरक्षणक्षम बनविणे ही कामें मोठ्या मुत्सद्देगिरीने व्हावयास पाहिजे होती! पण, देशाचे दुर्दैव असें खडतर की, लोकमान्य टिळक १ ऑगस्ट १९२० रोजी इहलोक सोडून गेले!