पान:पाकिस्तानचे संकट.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट वरिष्ठ कायदेमंडळांतल्या हिंदी सभासदांतले तृतीयांश सभासद मुसलमान असावे व त्यांची निवडणूक स्वतंत्र मतदारसंघांतर्फे व्हावी ही गोष्टहि या कराराने मान्य करण्यांत आली.* .. . २५ वर्षांनंतरची म्हणजे आजची परिस्थिति लक्षात घेऊन बोलणाऱ्याला या कराराविरुद्ध पुष्कळच बोलतां ये ल आणि करार झाल्याबरोबर कांहीं गोष्टी त्याच्याविरुद्ध बोलल्या जाऊ लागल्याहि ! पंजाब व बंगाल हे दोन प्रांत असे आहेत की, तेथें मुसलमानांचे संख्याधिक्य असले तरी तें बेताबाताचेंच आहे! अशा प्रांतांतून संयुक्त मतदारसंघ आग्रहाने सुरू व्हावयाला पाहिजे होते अशी टीका करता येईल, नाहीं असें नाहीं! पण, आग्रह धरून संधि गमावण्यापेक्षां, देवाणघेवाण करून संधि साधणे हेच टिळकांना श्रेयस्कर वाटले. असावें! 'याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय' वगैरे सूत्र हल्ली हिंदुसभावादी वारंवार बोलतात. तें टिळकांनी कधीं बोलून दाखविलें नसेल! हिंदु-मुसलमानांच्या ऐक्याविना स्वराज्य अशक्य असेंहि त्यांनी मोठ्याशा अट्टाहासानें- कधी प्रतिपादिले नाहीं ! बोलण्यापेक्षा कृतीचेच महत्त्व ते जास्त मानीत आणि आलेल्या संधीचा राष्ट्रदृष्टया पुरेपूर फायदा कसा घ्यावयाचा याच चिंतनांत त्यांची समयज्ञ बुद्धि गर्क असे ! मुसलमानांशी ऐक्य साधावें म्हणून त्यांनी कोणाच्या बंगल्यांवर खेटे घातले नाहीत अगर कोऱ्या चेकांची अवईहि उठविली नाहीं! मुसलमानांसह कांहीं व्हावयाचे असेल तर तें मसलमानांच्या अडीअडचणीच्या वेळी जागरूक राहिल्यानेच होईल, हे त्यांना पुरे माहीत होते! परकीयांपासून अधिकार मिळविण्याच्या बाबतींत जाणत्या हिंदूंचे मन सदैव तयारच आहे. स्वतःवरील काही प्रसंगामुळे मसलमानांचें मन तसेंच तयार होत आहे की काय हे पाहून, 'तप्तेन तप्तमयसा घटनाय योग्यम् ' या न्यायाने मुसलमानांच्या तत्परतेचा फायदा घेऊन, पुढे जाण्याला हरकत नाहीं असें टिळक मानीत असावे. १९१२-१३ पासून मुसलमानांच्या वृत्तींत राज्यकर्त्यांच्या धोरणांविषयी पूर्वीइतका निःशंकपणा शिल्लक राहिलेला नाहीं हें टिळकांच्या सूक्ष्म दृष्टीला दिसत होते. वरिष्ठ कायदेमंडळाच्या हिंदुसभासदांनी जी सुधारणांची

  • Report of the Indian Statutory Commission, Vol. I, Survey, pp. 187-188.