पान:पाकिस्तानचे संकट.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास articles preaching loyalty to the British rulers of India even if they were compelled to pursue an unfriendly policy towards Turkey. He thus raised the status of his co-religionists in the estimation of the British rulers. "*. (मुसलमानांची पत फिरून प्रस्थापित व्हावी म्हणून सर सय्यद अहमदखान यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मुसलमानांची शिक्षणपद्धति अपुरी व मागसलेली असल्याचे लक्षात आल्यामुळे ती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. ते १८९८ साली पैगंबरवासी झाले. ग्रीस व तुर्कस्थान यांच्यामधील लढाईमुळे इस्लामच्या एकजुटीच्या भावना उद्दीपित होत होत्या. त्यांना त्यांनी आपल्या मृत्युपूर्वी आळा घातला. तुर्कस्थानला प्रतिकूल असें धोरण चालवावें लागले तरी तें चालवूनहि, हिंदी मुसलमानांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांशी राजनिष्ठ राहावें अशा आशयाचे प्रचारात्मक लेख त्यांनी लिहिले. या मार्गांनी त्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या दृष्टीने आपल्या धर्मबांधवांची योग्यता वाढविली.) वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना इषारे देऊन हे सद्गृहस्थ आपल्या धर्मबंधूंचे महत्त्व वाढविण्याची दक्षता कशी घेत असत याची साक्ष पुढील उताऱ्यावरून पटण्यासारखी आहे: The Government was aware of the warnings of Sir Syed Ahmedkhan. He impressed upon the Government that if the agitation spread from the unwarlike (Hindu) to the warlike (Moslem) classes, it would go beyond writing and talking and would lead to blood-shed. If the Moslems joined the schemes of the congress, he warned that the Viceroy would realise that “ a Mohammedan agitation was not the same as a Bengali agitation.” The Government did not forget 1857 nor the need to conciliate the Moslems.T. ( सर सय्यद अहमदखान यांनी दिलेले इषारे सरकारच्या लक्षात होते. पडखाऊवृत्तीच्या हिंदूंमधील चळवळीचे वारें लढाऊ वृत्तीच्या मुसलमानां*The Problem of Minorities by K. B. Krishna, p. 95.. The Problem of Minorities, p. 108. ३पाकि०