पान:पाकिस्तानचे संकट.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ - पाकिस्तानचे संकट पाडून घेतां येतात हा भारतीय मुसलमानांचा गेल्या पन्नास साठ वर्षांचा अनुभव असल्याने, त्यांनी या मागणीचा पुरस्कार हट्टीपणाने चालू ठेविला आहे. सार्वजनिक व सामूहिक हितसाधनाच्या बाबतींतली मुसलमानांची दंडेली व दडपेगिरी आणि अशाच बाबतींतला हिंदूंचा भोंगळपणा व गमावूपणा यांमधील विरोध अत्यंत ढोबळ असा आहे. या दोन समाजांच्या मनोवृत्तींतला हा भेद मूलगामी आहे. वैयक्तिक स्वार्थ, खाजगी नफा-तोटा इत्यादि प्रकरणी डोळयांत तेल घालून वागणारे व अशा स्वार्थसाधनाच्या प्रसंगी देवधर्म, सत्यासत्य इत्यादि सर्व कल्पना झुगारून देणारे हिंदू, सामाजिक हितसंबंधांचा व न्यायप्रस्थापनेचा प्रश्न निघाला की, गाफील व आस्थाशून्य बनतात ! अशा बाबतींत मुसलमान समाज फाजील जागरूक आहे. सार्वजनिक स्वरूपाचे वाजवी हक्कहि हिरीरीने प्रस्थापित करण्यापूर्वी, हिंदुमनाला नाना त-हेच्या कुशंका जडतील व गडकऱ्यांनी वणिलेली र कसे करूं मी? काय करूं मी? ध्रुवपद नामी हे तो तुझिया गाण्याचे नांव न संकट जाण्याचें ॥ अशी भांबावलेली मनःस्थिति त्याला गोंधळांत पाडील. हक्क प्रस्थापित करावयाचा विचार मनांत आला की, मसलमान समाज तो हक्क न्याय्य असलाच पाहिजे अशा आविर्भावाने बोलूवागं लागेल. डॉ. आंबेडकर यांनी या आविर्भावाला व मनोवृत्तीला उद्देशुन Gangsters' Methods हा शब्दप्रयोग वापरला आहे व डॉ० परांजपे यांनी 'रामोशीगिरीचे तंत्र' असें या शब्दप्रयोगाचे भाषांतर केले आहे. या प्रकारांचा अवलंब करून, भारतीय मुसलमान समाजाने हिंदूंच्या हक्कावर सतत आक्रमण केले व पन्नास साठ वर्षे हा 'पराक्रम' केल्यावर, भारताचे तुकडे तोडून काढण्याचा व त्यांतला तोडलेला कांही भाग स्वतःच्या स्वतंत्र उपभोगासाठी अलग करून मागण्याचा डाव त्यांनी आतां रचलेला आहे. पन्नास साठ वर्षांत मुसलमानांच्या पराक्रमा'चा क्रमशः विस्तार कसा झाला हे पाहणे आतां ओघानेच प्राप्त झाले आहे.