पान:पाकिस्तानचे संकट.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४० पाकिस्तानचे संकट हेतूनें प्रेरित होऊन, इंग्रज व अमेरिकन लोक आपला पाठपुरावा करणारच नाहीत, असें तरी कां समजावें ! तात्पर्य असे की, बदलत्या परिस्थितीचा फायदा हरएक प्रकारे घेण्याची वृत्ति हिंदुराष्ट्रांत जागृत झाली तर, भोंवतालच्या घडामोडींचा फायदा मिळून स्वतंत्र हिंदुराष्ट्र अखंड हिंदुस्थानचे स्वामित्व मिळवू व टिकवू शकेल. मात्र हे घडण्यासाठी, संघटित हिंदु राष्ट्राने कांहीं सिद्धांत पक्केपणी आत्मसात् केले पाहिजेत! 'आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति' हा सिद्धांत स्वार्थीपणाचा असला व व्यक्तीच्या व्यवहारांत या सिद्धांताला अपवादभूत अशी काही उदाहरणे आढळत असली तरी, राष्ट्रांचे व्यवहार याच सिद्धांतानुरूप ठरत व चालत असतात हे हिंदुराष्ट्राने विसरून चालणार नाहीं! चालू युद्धांत जर्मनी व रशिया यांच्या परस्परसंबंधांत जे नाटकी बदल झाले त्यांचा अन्वयार्थ लावण्याला हे एकच सूत्र उपयोगी पडणारे आहे ! राजकारणी व्यवहार हा झगडे निर्माण करण्याचा व झगडे निस्तरण्याचाच व्यवहार आहे. ज्यांना झगडे नको असतील अशा शांतिब्रह्मांनी 'गीतारहस्य' म्हणून, यदि मामप्रतीकारं अशस्त्रं शस्त्रपाणयः .. धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् __ या श्लोकाचा खुशाल निदिध्यास घ्यावा व देवघरांत जाऊन बसावें! अशा शांतिब्रह्मांना देवघरांत खऱ्या अर्थानें पूज्य मानावयाला हरकत नाही; इतरत्र मात्र त्यांना निराळया अर्थानें पूज्य मानले पाहिजे! हे व असे सिद्धांत सदैव स्मरणांत बाळगून हिंदुराष्ट्रातल्या प्रत्येक लहानथोर व्यक्तीने .. अहं हिंदुः अहं हिंदुः, अहं हिंदुःप्रतापवान् मम देशो ममैवायं स्वातंत्र्यं मम दैवतम् ॥ या हिंदुसंघटनेच्या महामंत्राचा घोष करावा! हिंदुराष्ट्रांत ही वृत्ति मुरली तर पाकिस्तानची कल्पना कबरस्थानांत गाडली गेलीच पाहिजे!