पान:पाकिस्तानचे संकट.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

याप्रकरण १३ प्रकरण १३ वें का गाना माता का हिंदसंघटनेचा महामंत्र मागील प्रकरणांतून जे अनेक मुद्यांचे विवेचन करण्यांत आले आहे तें लक्षपूर्वक वाचणाऱ्या वाचकांच्या ध्यानांत एक गोष्ट निश्चित आली असली पाहिजे. पाकिस्तान वगैरे सर्व संकटांना तोंड देण्याचा स्वाधीनचा उपाय 'हिंदुसंघटन' हाच होय हा मुद्दा या विवेचनाच्या ओघांत वारंवार मांडण्यांत आलेला आहे. आणि भोवतालच्या सर्व परिस्थितीचा दूर दृष्टीने विचार केला म्हणजे फिरून एकवार असें म्हणणे भाग पडतें की, सध्यांच्या काळी हिंदुसमाजाच्या किंवा हिंदुराष्ट्राच्या उद्धाराचा हिंदुसंघटन हा एकच स्वाधीनचा मार्ग होय. हिंदुसंघटन हा एक सहा अक्षरांचा मामुली शब्द दिसतो. पण, त्या शब्दांत जें सुप्त सामर्थ्य आहे त्याची ओळख ज्याच्या ज्याच्या मनाला पटेल तो तो हिंदु असेंच म्हणूं लागेल की, हा एक साधा निर्जीव शब्द नसून, तो एक संजीवनी मंत्र आहे. जुन्या पद्धतीने जपावयाच्या मंत्रांचा अर्थ बुद्धीला न कळला तरी ती गोष्ट चालं शकत असे. या संजीवनी मंत्राचा अर्थ बुद्धीला कळला आणि हातून त्या अर्थानुरूप कृति घडली तरच हा महामंत्र फलदायी ठरणार आहे, हा या महामंत्राचा विशेष आहे. तीस कोटी लोकांच्या जुटीचे सामर्थ्य किती अफाट असू शकेल याची कल्पना येण्यासाठी प्रत्येक हिंदूने आपली नजर क्षणमात्र सध्यांच्या युद्धांत गुंतलेल्या राष्ट्रांकडे वळवावी. एका राष्ट्राचे संघटित मनुष्यबळ म्हणे ५ कोटी आहे, दुसऱ्याचे म्हणे ७ कोटी आहे आणि अफाट दिसणाऱ्या तिसऱ्याचेंहि १५।१७ कोटींहून जास्त नाही. असे असूनहि, ही राष्ट्र एवढा जगड्व्याळ संग्राम चालवितात कसा याचा सूक्ष्म विचार प्रत्येक हिंदूने केला पाहिजे. सात कोटींचे राष्ट्र आणि तीस कोटींचे राष्ट्र यांच्या तुलनेत सात कोटींचे राष्ट्र श्रेष्ठ ठरत असेल तर, ते तसें कशामुळे ठरतें या प्राथमिक