पान:पाकिस्तानचे संकट.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आंबेडकरांना काही सवाल १६३ , हिंदूंना न्यायाने असे म्हणता येईल की, मुस्लीम राज्याच्या . . धर्मवेडाला दिलेले असहाय बळी म्हणून आमच्या धर्मबांधवांना या . पाकिस्तानात सोडावयाला आम्हीं तयार नाहीं* असें ठसकेबाज उत्तर डॉ. आंबेडकरांनीच देऊन ठेविलेले आहे. । पंजाबीं'चा आग्रह आणि डॉ. आंबेडकरांच्या उत्तरांतील हा फणकारा या दोहोंचा एकत्र विचार केला म्हणजे सहज असें मनांत येते की, या दोन गोष्टींचा मेळ मुळीच बसण्यासारखा नाही. आणि, हिंदुमहासभेप्रमाणेच डॉ० आंबेडकरहि पाकिस्तानची मागणी झिडकारून लावावी अशाच मताचे असावे. डॉ. आंबेडकरांच्या वतीने कदाचित् असें म्हणता येईल की, नकार यावयाचा तो मुसलमानांकडून आला म्हणजे मग हिंदूंना आपल्या अटींवर त्यांच्याशी तडजोड करणे शक्य व्हावे म्हणून डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या मागणीला मर्यादित स्वरूपात मान्यता दिलेली आहे. डॉ. आंबेडकरांचें समर्थन म्हणून असा कोटिक्रम कोणी केलाच तर त्याला असे उत्तर आहे की, अशा रीतीने हातटेकीस येण्याइतके मुसलमान कच्च्या दिलाचे नाहींत. डॉ० आंबेडकरांनी द्विराष्ट्र कल्पनेला मान्यता दिली आहे. द्विराष्ट्र कल्पनेच्या पोटांतलें पाकिस्तान अपरिहार्य आहे ही कबुलीहि त्यांनी दिली आहे, एवढ्या सोइस्कर गोष्टींनाच मुसलमान बिलगून बसतील आणि पाकिस्तानांत किती मुलख दडपावयाचा व तडजोड म्हणून कोणता मुलूख सोडावयाचा एवढ्याच मुद्यापुरता घोळ ते घालीत बसतील, हीच भीति विशेष आहे. मुसलमानांना सवलत देण्याबाबत तोंडांतून निघून गेलेला शब्द अगर मुसलमानांच्या पदरांत पडलेली सवलत यांचा पाय केव्हांहि मागे आलेला नाही, हे गेल्या ८०-९० वर्षांच्या इतिहासाचे सार आहे. डॉ. आंबेडकरांनी आपली म्हणून जी योजना मांडली ती मांडण्यांत त्यांचा सद्हेतूच असेल; हिंदूंच्या हितासाठीच त्यांनी हा खटाटोप केला असेलं; पण, सदहेतूने केलेल्या गोष्टी सुफलदायीच ठरतात हा नियम मुसलमानांच्या बाबतीत तरी खोटा ठरला आहे, हे डॉ० आंबेडकरांनी तरी कसे विसरून चालेल? गोलमेज परिषदेच्या सगळ्या कामकाजाकडे आस्थेवाईकपणाने व अभ्यासूपणाने पाहणाऱ्या डॉ० आंबेडकरांना हे माहीत आहेच की, सर तेज बहादुर सप्रू, डॉ० जयकर, डॉ० मुंजे

  • Thoughts on Pakistan, p. 106.