पान:पाकिस्तानचे संकट.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आंबेडकरांना कांहीं सवाल १५७ काँग्रेस मंत्रिमंडळांना प्रांतांतून सत्ता लाभली ती हिंदु मतदारांच्या औदार्यामुळे लाभली एवढ्याच अर्थाने या मंत्रिमंडळांना हिंदु मंत्रिमंडळे म्हणतां येईल. अवांतर गोष्टींचा विचार केला तर, या मंत्रिमंडळांना हिंदु मंत्रिमंडळे म्हणतांच येणार नाही. किबहुना, नाह. पनामा आमचें मंत्रिमंडळ हे हिंदु मंत्रिमंडळ नाही हीच तर काँग्रेस मंत्रिमंडळांची प्रौढी आहे. काँग्रेस ही संस्था हिंदुहिताचें पालन व संवर्धन करू शकत नाही, तें कार्य करण्याचा मक्ता हिंदुसभेने घेतला आहे असें गांधीजीनी 'हरिजन'मध्ये काही महिन्यां पूर्वी स्पष्ट लिहिले होते, हेहि लक्षात ठेविण्यासारखे आहे. काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी मुसलमानांच्या बाबतीत अगर अन्य जमातींच्या बाबतींत अवलंबिलेलें धोरण चुकीचे असेल; पण, तें आक्रमक स्वरूपाचे होतें हे म्हणणे बरोबर नाही. या धोरणांतील चुकांचा विचार स्वतंत्रपणे करण्यासारखा असल्यामुळे, तूर्त एकच गोष्ट सांगितली म्हणजे पुरे आहे.. हिंदुसमाज आक्रमक वृत्तीचा आहे की काय या प्रश्नाचे तर्कशुद्ध उत्तर द्यावयाचें तर काँग्रेस मंत्रिमंडळांचा आचार कसा होता हा मुद्दा विचारांत घेतां येणार नाही. हिंदुसमाजाची परंपरासिद्ध वृत्ति आत्रमक आहे की काय, हाच मुद्दा या बाबतींत महत्त्वाचा आहे आणि या मुद्याचे स्पष्ट उत्तर नकारार्थीच देणे प्राप्त आहे. ही हिंदुधर्म व त्या धर्माचा आचार करणारा हिंदुसमाज यांचे मुसलमानी अगर ख्रिस्ती अशा समाजांपासून भिन्नत्व कोणते आहे या प्रश्नाचे सांगोपांग विवेचन या ठिकाणी करणे शक्य नाही. एकच गोष्ट सांगन हा मुद्दा संपविला पाहिजे. भौतिक शास्त्रांचा विचार करणारे युरोपांतले आधुनिक विद्वान् ज्या शास्त्रीय पद्धतीचा अंगीकार करतात त्याच पद्धतीचा अवलंब करून, हिंदु विचार-वीरांनी आपल्या तत्त्वज्ञानाचे भांडार संपन्न केले आहे. कसलीहि आग्रही वृत्ति धरणारा संशोधक खरा संशोधक ठरूंच शकत नाही ही गोष्ट अगदी खरी आहे. संशोधन करणाऱ्या माणसाला आपल्या बुद्धीची सगळी द्वारे सताड खुली ठेवावी लागतात. पृथक्करण, तुलना इत्यादींच्या मार्गाने आपल्या मताची छाननी त्याला करावी लागते आणि त्यामुळे फार वेळपर्यंत त्याचे मन हेलकावेच खात राहते. आग्रहशून्यपणा हा गुण अशा संशोधक