पान:पाकिस्तानचे संकट.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ पाकिस्तानचे संकट चाळीस कोटी लोकसंख्येच्या या देशांत प्रादेशिक एकराष्ट्रीयत्व शक्य नसेल तर, दुसरे कोणतें राष्ट्रीयत्व या देशांत नांदं शकेल? या प्रश्नाचें.एकच उत्तर आहे आणि तें 'हिंदुराष्ट्रीयत्व ' हेच आहे. स हिंदुस्थानांत इतस्ततः विखुरलेले मुसलमान हे जसे सगळे एका वंशाचे नाहीत तसेच सगळ्या हिंदुस्थानभर पसरलेले जवळजवळ तीस कोटी हिंदु हेहि सगळे एका वंशाचे नाहीत. शुद्ध, बिनभेसळीच्या रक्ताचाच विचार केला तर, आर्य, द्रविड, मंगोल, सिथियन अशा अनेक प्रकारच्या रक्तांची भेसळ येथे झालेली आढळते. आर्य लोक या देशांत आले ते संख्येने बेताचेच होते. येथे स्थिर झाल्यावर त्यांनी येथे पूर्वीच असलेल्या अनार्य लोकांना आत्मसात् व सुसंस्कृत करण्याचा उद्योग सुरू केला व तेव्हांपासून ही रक्ताची भेसळ अव्याहत चालूच आहे. भीससेन आणि हिडिंबा यांचा पुराणांत प्रसिद्ध असलेला विवाह हे या रक्तमिश्रणाचें प्रसिद्ध उदाहरण म्हणून सांगतां येईल. पण, एखाद्या लोकसमूहांत भिन्न भिन्न रक्तांची भेसळ असली तरी, तो समूह इतर अनेक कारणांमुळे 'राष्ट्र' या पदवीप्रत पोंचू शकतो! त्या समूहाला एका सूत्रांत गोवण्याचे डोळस प्रयत्न किती व किती सातत्याने झाले आहेत. या मुद्याचा विचार करू. च अशा समूहाची 'राष्ट्र' ही पदवी प्रस्थापित करावी लागते. या दृष्टीने काही गोष्टी महत्त्वाच्या म्हणून लक्षात ठेविल्या पाहिजेत. भरतखंडाच्या दक्षिण भागांत द्राविड भाषा रूढ आहेत हे खरे; पण संस्कृत भाषेत पांडित्य करणारे बहुतेक सर्व मोठे अचार्य दक्षिण भारतानेंच पुरविले आहेत, ही गोष्ट उपेक्षणीय नाही. द्राविडभाषा संस्कृतोद्भव नाहीत हे खरे असले तरी, त्याहि भाषा संस्कृतमुळे समृद्ध बनलेल्या आहेत. हिंदुस्थानच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या कोट्यवधि हिंदूंना एकत्र करण्याचे एक साधन म्हणून संस्कृत भाषा व तिच्यापासून निघालेल्या अगर तिच्या वर्चस्वामुळे समृद्ध झालेल्या भारतीय भाषा यांचा फार उपयोग झालेला आहे. बलिन येथील प्रशियन म्युझियममधील भारतीय विभागाचे क्यूरेटर डॉ० वॉल्डस्मिथ यांनी संस्कृत भाषेचे हे महत्त्व ओळखन असे म्हटले आहे की, ज्या हिंदूला संस्कृत कळत नाहीं तो वस्तुतः हिंदूच नव्हे. हे विधान शब्दशः मान्य करण्याचे कारण नसले तरी,