पान:पाकिस्तानचे संकट.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

द्विराष्ट्रवादाचे खंडन १४५ असे वाटते ते हिंदु या शब्दाची व्याख्या संकुचित करतात आणि त्या व्याख्येत आपण नाहीं असें भासवितात. हीच गोष्ट शीखांस लागू आहे.* ___ मुसलमान समाजाला आपले वेगळेपण व्यक्त करण्याची इच्छा इतक्या तीव्रतेने कां होते हैं डॉ० आंबेडकर ओळखुन आहेत. एकाद्या समाजाचे राजकीय महत्त्व (Political Importance ) विशेष आहे, एकादा समाज राजनिष्ठ आहे, एकाद्या समाजाने ब्रिटिश साम्राज्याची अगर ब्रिटिश सरकारची महत्त्वाची कामगिरी केली आहे म्हणून त्या समाजाला जादा प्रतिनिधित्व (Weightage) देणे गैर आहे असें डॉ० आंबेडकरांनीच गोलमेज परिषदेच्या वेळी बजावले होते. जादा प्रतिनिधित्वाच्या वेळी आपले राजकीय महत्त्व गाजविणारा समाजच आज पाकिस्तान मागत आहे; मग, डॉ. आंबेडकरांनी त्या मागणीला अंशतः तरी तात्त्विक मान्यता कां द्यावी? . हिंदंशी आपलें पटण्यासारखें नाहीं आणि आपली त्यांच्याशी एकत्र नांदण्याची इच्छा नाही हे जगाला दिसावे म्हणून मुसलमानांनी गेल्या १५-२० वर्षांत कोणते उपाय योजले व त्यांचा परिणाम काय झाला याची जंत्री दिल्यानंतर, डॉ. आंबेडकर यांनी पृ० १८० वर या प्रकरणाचा सूचक सारांश थोडक्यांत दिला आहे. फेब्रुवारी १९२९ पासून एप्रिल १९३८ पर्यंत जो नऊ वर्षे दोन महिन्यांचा काळ लोटला तेवढ्याचा विचार केला तर त्यांतल्या २१० दिवसपर्यंत मुंबई शहरांत रक्तपात चालला होता आणि या काळांत अशा लढतीमुळे ५५० माणसें मेली व ४,५०० माणसें जखमी झाली. बंगाल सरकारने पुरविलेल्या माहितीवरून डॉ. आंबेडकर यांनी असा निष्कर्ष काढिला आहे की, १९२२ ते १९२७ या पांच वर्षांत बंगालमध्ये जवळजवळ २५ हजार स्त्रियांचे अपहरण झाले. आपले राजकीय हेतु सिद्ध व्हावे म्हणन मुसलमानांनी अवलंबिलेल्या मार्गाचे वर्णन करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी Gangsters' Methods (वाटमारी करणाऱ्या लोकांचे मार्ग) हा शब्दप्रयोग बनविला आहे (पृ० २६७). मशिदीजवळ हिदूंकडून वाजविण्यांत येणारी वायें वगैरे निमित्तें काढून मुसलमानांकडून हे आक्रमण *ज्ञानकोश, प्रस्तावनाखंड, विभाग १, पृ० ७७. ) Indian Round Table Couference Proceedings of SubCommittees, Part II, Sub-Committee III 1931, p. 110. - १०पाकि०