पान:पाकिस्तानचे संकट.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

द्विराष्ट्रबादाचे खंडन लक्षात घेऊन प्रांतरचना झाली व प्रांतांची संख्या आजच्याहून कमी झाली तर, एकाद्या प्रांतांत मुसलमानांचा धार्मिक गट कदाचित् बहुसंख्य राहील इतर सर्व प्रांतांत तो अल्पसंख्य राहील. सबंध देशाचा व त्या देशाच्या अध्यवर्ति सरकारचा विचार करतांना मुसलमान फार तर अल्पसंख्य वर्ग (Minority) ठरतील. फक्त धार्मिक बाबतीत ते हिंदूंहून भिन्न आहेत. धार्मिक गोष्टींच्या संरक्षणाची योजना प्रांतांतच पूर्णपणे होण्यासारखी असल्यामुळे, अखिल भारताच्या कारभारांत व व्यवस्थेत मुसलमानांचें भिन्नपण मान्य करण्याचे कारणच नाही. . एकत्र नांदण्याची मुसलमानांची इच्छा नाहीं, जबरदस्तीने एकत्र नांदावें लागत असल्यामुळे ते कटकटी करतात, अशा स्थितीत वेळीच त्यांचे भिन्नपण मान्य करावें व स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्यांना वेगळा संसार थाट द्यावा अशा आशयाचाहि कोटिक्रम डॉ. आंबेडकरांनी केला आहे. या कोटिक्रमामागे अनेक गोष्टी उभ्या आहेत. त्यांतल्या कांहीं हिंदुहिताच्या आहेत असे डॉ० आंबेडकरांचे मत आहे. त्यांचा विचार मागाहून करण्याचे ठरवून तूर्त एकाच मुद्याचा विचार करूं. एकत्र नांदण्याची व भिन्नपणे नांदण्याची इच्छा (Will) हा मुद्दा मोठा मजेचा आहे. .. लखनौ करारापासून ज्या. सगळ्या...योजना हिंदूंकडून स्वीकारण्यांत आल्या अगर हिंदूंवर लादण्यांत आल्या त्यांमध्ये अखंड देशाची कल्पना साक्षात् गोंविलेली आहे. हे विसरून, मुसलमानांच्या इच्छेपूढे दबून, 'पाकिस्तान' म्हणून देशाच्या एका भागावर हिंदूंनी तुळशीपत्र ठेवावयाचे तर हळुहळू त्यांना दक्षिणभागांत एकाद्या ख्रिस्ती-स्तानाचीहि जागा खाली करून द्यावी लागेल !.. . कारण, कोचीन, त्रावणकोर वगैरे भागांत आजच ख्रिस्ती लोकसंख्या बेसुमार आहे व ख्रिस्ती लोकसंख्येचे प्रमाण त्या भागांत झपाट्याने वाढत आहे. हा प्रकार असाच चालला तर कोणाची मजल कोठवर जाईल याचा नेमच नाही.. इच्छेचे हे अडाणी माप रूढ झालें तर, अँग्लोइंडियन व डोमिसाइल्ड युरोपियन हेहि हिंदुस्थानांत एकादें 'नॅशनल होम' मागू लागतील ! गोलमेज परिषदेच्या वेळी यांतल्या कांहीं बृहस्पतींच्या मनांत अशी काही