पान:पाकिस्तानचे संकट.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांनी मांडलेल्या पाकिस्तानच्या योजना १२३ असे सुचवितात की, तपशील पुढे आला व योजना स्वीकार्य दिसली तर ती स्वीकारण्याला आमची हरकत नाहीं ! गेल्या मे महिन्यांत बॅ० जीनांनी मद्रास येथें पाकिस्तानवर प्रवचन झोडले. त्यानंतर व तत्पूर्वी भारतमंत्र्यांसारख्या इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेली भाषणे लक्षात घेतली तर, पाकिस्तान योजनेला त्यांचा विरोध असला तरी तो गुळमुळीतच दिसतो! २२-४-१९४१ रोजी मि० अॅमेरी यांचे पार्लमेंटमध्ये भाषण झाले. त्यांतली पुढील वाक्ये या दृष्टीने पाहण्यासारखी आहेत. मि० अॅमेरी म्हणाले : I am not concerned here to discuss the immense practical difficulties in the way of this so-called Pakistan project stated in this its extreme form nor need I go back to the dismal record of India's history in the eighteenth century to point out the terrible dangers inherent in any break-up of the essential unity of India, at any rate in its relation to the outside world. (अशा अतिरेकी स्वरूपांत मांडलेल्या पाकिस्तान योजनेंत व्यावहारिक अडचणी किती जबरदस्त आहेत याची येथें चर्चा करणे मला अवश्य दिसत नाही. हिंदुस्थानचे मूलभूत ऐक्य बिघडल्याने नुसत्या बाहेरच्या जगांतून देखील हिंदुस्थानवर किती संकट येण्याचा संभव आहे हे दाखविण्यासाठी १८व्या शतकांतल्या हिंदुस्थानच्या इतिहासाच्या उदास क्रमाकडे वळण्याचेहि मला कारण दिसत नाही.) . ही भाषा मोठी मुत्सद्देगिरीची आहे म्हणजेच तिच्यांत दुटप्पीपणा ओतप्रोत भरलेला आहे. 'अतिरेकी' स्वरूपामुळे पाकिस्तानची योजना मान्य नाहीं, व्यावहारिक अडचणींमुळे ती स्वीकारतां येत नाहीं हे शब्दप्रयोग मुसलमानांच्या आशांना फुलोरा आणणारे आहेत. उलटपक्षी, हिंदुस्थानच्या मूलभूत ऐक्याचा उल्लेख हिंदूंनी संतुष्ट राहावे यासाठी केलेला आहे.' :: अशी अतिरेकी व अव्यवहार्य योजना न मांडतां पाकिस्तानची कल्पना बोलाल तर तिचा विचार करूं, असेंहि आश्वासन या भाषेत , दडून बसलेले आहे. त्याचा फायदा मुसलमान घेणार नाहीत, असें नाहीं.