पान:पाकिस्तानचे संकट.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट जवळजवळ ५० लक्ष रुपये आहे. बनारस संस्थानचे क्षेत्रफळ ८७५ चौरस मैल असून त्याची लोकसंख्या ३,९१,२७२ आहे. १९३५च्या घटनाकायद्यांत ही दोन संस्थानें क्रमांक ८च्या गटांत समाविष्ट करण्यांत आली आहेत. - त्रावणकोर-कोचीन गट संस्थानांच्या ९व्या गटांत त्रावणकोर, कोचीन, पुदुकोटा, बंगनपल्ली व सोंडूर ही पांच संस्थाने आहेत. यांपैकी त्रावणकोर व कोचीन ही मोठी संस्थाने आहेत. त्रावणकोरचे क्षेत्रफळ ७,६२५ चौरस मैल आहे. त्याची लोकवस्ती ५०,९५,९७३ आहे व वार्षिक उत्पन्न सरासरी २ कोटी ३२ लक्ष रुपये आहे. त्रावणकोरच्या लोकवस्तींत मुसलमानांचे शेकडा प्रमाण ६ आहे. कोचीनचें क्षेत्रफळ १,४१७ चौरस मैल आहे, लोकसंख्या १२,०५,०१६ आहे व वार्षिक उत्पन्न सरासरी ९२ लक्ष रुपये आहे. मुसलमान लोकवस्तीचे प्रमाण ६.८ आहे. सोंडूर या छोटेखानी मराठा संस्थानचे क्षेत्रफळ अवघे १६७ चौरस मैल असून, त्याचे वार्षिक उत्पन्न सरासरी १॥ लक्ष रुपये आहे. तेथील लोकवस्ती फक्त १३,५८३ आहे. रजपूत संस्थाने उदेपूर, जयपूर, जोधपूर, बिकानेर, भरतपूर, बुंदी, कोटा, अल्वार वगैरे २८ रजपत संस्थानांचा संघ क्रमांक १० या गटांत समाविष्ट करण्यांत आलेला आहे. या सर्व संस्थानांत मिळून मुसलमान लोकवस्तीचे प्रमाण शेकडा १० च्या आसपास आहे. रजपुतान्यांतल्या सर्व संस्थानांची एकवट लोकसंख्या १ कोटि १२। लक्ष आहे. उदेपूर संस्थानचे क्षेत्रफळ १२,९४१ चौरस मैल असून त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे ८१ लक्ष रुपये आहे. जय: पूरचे क्षेत्रफळ १६,६८२ चौरस मैल आहे व वार्षिक उत्पन्न जवळजवळ १॥ कोटी रुपये आहे. या गटांतले सर्वांत मोठे संस्थान जोधपूर आहे. त्याचे क्षेत्रफळ ३६,०७१ चौरस मैल असून वार्षिक उत्पन्न १।। कोटि रुपये आहे. बिकानेरचे क्षेत्रफळ २३,३१७ चौरस मैल असून उत्पन्न १॥ कोटीच्या आसपास आहे. भरतपूरचे क्षेत्रफळ २,००० चौरस मैल असून वार्षिक उत्पन्न ३२-३३ लक्ष रुपये आहे. बुंदी संस्थानचे क्षेत्रफळ २,२२० चौरस मैल असून त्याचे