पान:पाकिस्तानचे संकट.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- पाकिस्तानचे संकट लोकसंख्या १९३१च्या शिरगणतीप्रमाणे ३८,८७,०७० आहे. या लोकसंख्येत २८,३०,८०९ म्हणजे शें० ७३७ मुसलमान आहेत. १९२१च्या शिरगणतीत येथील लोकसंख्या ३२,७९,३८७ होती. १९२१ ते १९३१ च्या दहा वर्षांत पंजाबमधील लोकसंख्या शेकडा १४ या प्रमाणात वाढली. सिंध सोडन मुंबई इलाख्याची लोकसंख्या शेकडा १२.४ या प्रमाणात वाढली आणि सिंधमध्ये मात्र ही वाढ शेकडा १८.५ इतकी झाली! गुजराथचा बिनसंस्थानी भाग, मुंबई शहर, महाराष्ट्राचा बिन संस्थानी भाग व कर्नाटकचे जिल्हे मिळून जो मुंबई इलाखा उरला. तो १८१८ पासून जवळजवळ आहे तसाच आहे. या विभागाचे क्षेत्रफळ ७७,२७१ चौरस मैल असून, १९३१च्या शिरगणतीप्रमाणे लोकसंख्या १,७९,१६,३१८ आहे. यांत मुसलमान १५,८३,२५९ असून त्यांचे शेकडा प्रमाण ८.३ आहे. FFEIFTERST E EL TIE TRI बंगाल, बिहार, आसाम, ओरिसा हे प्रांत आज भिन्न भिन्न दिसतात; पण, एके काळी हे सर्व प्रांत व सध्यांच्या संयुक्त प्रांतांतला आग्रा विभाग यांची दावण एकत्र गुंफण्यांत आलेली होती. १८३४ साली आग्रा विभाग बंगालमधून अलग करण्यात आला. शिल्लक उरलेला भूभागहि अफाट होता. राज्यकारभाराच्या सोईसाठी या भागाची विभागणी करावी अशा योजना मधून मधून पुढे येत होत्या. पण कर्झनशाहीत बंगालच्या फाळणीची जी योजना पुढे आली तिच्या पोटांत दुष्ट हेतु दडून बसलेला होता. पूर्वबंगालचे १५ जिल्हे व आसाम यांचा मिळून नवा प्रांत बनविण्याची क्लुप्ति मुसलमानांचे वर्चस्व निर्माण करण्यासाठीच सुचली होती. बंगालची ही फाळणी लोकांच्या भावनांना फार झोंबली व तिच्याविरुद्ध होणाऱ्या चळवळीमुळे देश दुमदुमून गेला. १९११ सालच्या दिल्ली दरबारच्या वेळी ही फाळणी रद्द करण्यांत आली. या वेळीच बिहार-ओरिसा हा भाग स्वतंत्र प्रांत म्हणून वेगळा काढण्यात आला आणि आसामवर स्वतंत्र चीफ कमिशनरची नेमणूक झाली.