पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२२ येशूचे पुन्हा उठणे. [प्रक० १६३ त्याला चोरून नेले; आणि हे सुभेदाराच्या कानी पडले तर आह्मी त्याला समजावू व तुह्मास निर्भय करूं." मग त्यांनी पैका घेऊन आपणांस शिक- विल्याप्रमाणे केले. २. त्याच दिवसी मारया माग्दालीणी व याकोबाची आई मारया व सलोमे, ह्या त्याला लावण्याकरितां पाहटेस येशूच्या थड्याकडे आल्या. आणि त्या एकमेकींस ह्मणाल्याः"आमाकरितां थड्याच्या दारावरून धोड कोण लोटील?" परंतु त्यांनी दृष्टि लावली तो धोंड थड्यावरून एकी- कडे लोटलेली आहे असे त्यांनी पाहिले. तेव्हांशिमोन पेतर व ज्यावर येशची प्रीति होती असा दुसरा शिष्य त्यांकडे धांवत येऊन माझ्या माग्दाली- णीने त्यांस मटले. "त्यांनी प्रभूला धड्यांतून नेले आणि त्याला कोठे ठेवले हे आह्मास ठाऊक नाही."-परंतु त्या दुसऱ्या बायका थड्यांत गेल्यावर प्रभु येशूचे शरीरत्यांस मिळाले नाही. आणि त्याविषयी त्यांस भ्रांति पडली असतां, पाहा, लखलखीत वस्त्र ल्यालेले दोन मनुष्य त्याच्याजवळ उभे राहून ह्मणाले: “घाबरूं नका! खांबी दिलेला येशू याचा तुह्मी शोध करितां, मेलेल्यांमध्ये जिवंताचा शोध तुह्मी कां करितां? तो एथें नाहीं, तर उठला आहे! या, प्रभु निजला होता तीही जागा पाहा. आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांस सांगा." तेव्हां त्या बायका भयाने व फार आनंदाने थड्यापासून लवकर निघून त्याच्या शिष्यांस वर्तमान सांगाव- यास धांवत गेल्या. ३. मग (मारया माग्दालीणीपासून वर्तमान ऐकून) पेतर व दुसरा शिष्य निघून थड्याकडे जाऊ लागले. तेव्हां ते दोघे बरोबर धांवले, आणि तो दुसरा शिष्यपेतरापेक्षा लवकर धांवून थड्याजवळ पहिल्याने पोहंचला आणि ओण- वून त्याने प्रेतवस्त्रे ठेवलेलींपाहिली, तरी तो आंत गेला नाही. मग शिमोन पेतर त्याच्या मागून येऊन थड्यांत गेला, आणि प्रेतवस्त्रे ठेवलेली व जो रुमाल येशूच्या डोक्याला होता तो प्रेतवस्त्रांबरोबर ठेवला नाही, तर निराळा एकीकडे घडी करून ठेवलेला, असे त्याने पाहिले. मग जो दुसरा शिष्य पहिल्याने थड्याकडे आला तोही आंत गेला आणि पाहून विश्वासला; कारण त्याला मेलेल्यांतून पुन्हा उठावे लागते, हा शास्त्रलेख तोपर्यंत ते समजले नाहीत.--मग शिष्य फिरून आपल्या घरी गेले.