पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

योना भविष्यवादी. प्रक० ८० परमेश्वराने कळपापासून घेऊन भविष्यवादी केले, त्याने दावीदाच्या राज्याचा नाश होणार होता याविषयी जसे, तसे मशीहाकडून जी त्याची पुनःस्थापना होणार याविषयीं भविष्य केले. "या समयीं दावीदाचा जो मंडप पडलेला आहे तो मी पुन्हा उभारीन, आणि त्याची भगा. भरीन; आणि त्याच्या पाडलेल्या रचना पुन्हा उभारीन, आणि जसा पुरातन दिवसांत होता तसा पुन्हा बांधीन (अ०९, ११).-ओबद्या याचे भविष्यभाषण इस्राएलाचे वैरी जे अदोमी यांविषयी आहे.

  • ) यहुदी जर यज्ञहीन आणि एफोदहीन (एफोद हा मुख्य याजकाच्या पोषाकाचा एक

भाग होता त्यांत उरीम व थुम्भीम होते. प्रक०३९क०१ पाहा) असले, तर ते अणखी इस्रा- एली असे राहत नाहीत. “प्रतिष्ठापन" झणजे विधर्मी प्रकृतिपूजा, आणि "तराफोम" झणजे ग्रहदैवत ही जर त्यांस नाहीत, तर त्यांस विधर्मी किंवा मर्तिपूजकही झणवत नाही. ह्या भविष्यभाषणाचा अर्थ तर असा आहे की, यहूदी लोक बहुत दिवसपर्यंत खरे इस्राएलो राहणार नाहीत आणि विधी मन्तिपूजकही होणार नाहीत, हाणजे त्यांचा धर्म खरा नाहीं व खोयही नाही. बास्तविक पाहिले असनां यहुद्यांची स्थिति असीच होऊन ते मध्येच लोवकळत राहिले आहेत. प्रक० ८०. योना भविष्यवादी. १. योना भविष्यवादी याकडे परमेश्वराचे वचन आले की : "तूं नीनवे नगरास*) जाऊन उपदेश कर. कारण की त्यांची दुष्टाई मजसमोर आली आहे.” परंतु योना तर्शिश्यास (स्पेन देशांतील एका बंदरास)जाणाऱ्या एका गलबतावर चढून परमेश्वरासमोरून समुद्रावर पळून गेला. तेव्हां पर- मेश्वराने समुद्रांत मोठा वारा सुटू दिला आणि गलबत फुटेल असी शंका झाली. आणि नावाडी प्रत्येक आपल्या देवाला अरोळी मारूं लागले. परंत योना गलबताच्या तळीं उतरून झोपेत होता. तर तांडेल त्याकडे येऊन ह्मणाला: “अरे निजणाऱ्या, तुझ्या मनांत काय आहे ? ऊठ आपल्या देवाला अरोळी मार!" आणि ते एकमेकाला ह्मणाले : “या हो, आपण पण पाडूंव जाणं की कोणामुळे है अरिष्ट आपणावर आले आहे." मग त्यांनी पण पाडला आणि पण योनावर पडला. तेव्हां त्यांनी त्याला म- टले: “तुझा देश कोणता?" तो बोललाः " मी इब्री आहे, आणि मी परमे- श्वराला आकाशांतल्या देवाला भितो. आणि मी त्यासमोरून पळून आलो